शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

विकास आराखड्यातून रिद्धपूरचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 9:56 PM

महानुभावपंथीयांची काशी श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील विकासकामांसाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अंंतर्गत २१५ कोटी रुपयांचा आराखडा आ. अनिल बोंडे यांनी प्रस्तावित केला आहे. देशभरातून येणारे महंत व भाविकांना या ठिकाणी शेगावच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध होणार आहेत.

ठळक मुद्देशेगावच्या धर्तीवर सुविधा : २५ कोटींच्या विकासकामांना मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : महानुभावपंथीयांची काशी श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील विकासकामांसाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अंंतर्गत २१५ कोटी रुपयांचा आराखडा आ. अनिल बोंडे यांनी प्रस्तावित केला आहे. देशभरातून येणारे महंत व भाविकांना या ठिकाणी शेगावच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध होणार आहेत.रिद्धपूर येथून मराठी भाषेचा उगम झाला. येथेच मराठी भाषेचे विद्यापीठ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक भूमिका असून, त्यांनी ग्रामविकासासाठी २१५ कोटींच्या निधीला तात्त्विक मंजुरी दिली आहे. या निधी अंतर्गत गावातील सर्व काँक्रीट रस्ते, बाजार चौकातील काँक्रीटीकरण, रंगमंच, शौचालये व सौंदर्यीकरणासोबतच बंदिस्त नाली बांधकाम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे. रिद्धपूर गावात कित्येक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवते. आठ-दहा दिवसआड लोकांना पाणीपुरवठा होतो. या गंभीर समस्येची दखल घेऊन मुख्यमंत्री पेयजल पाणीपुरवठा अंतर्गत १२ कोटी रुपये मंजूर करून विश्रोळी धरणातून पाइप लाइन तसेच गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मोर्शी-चांदूरबाजार रोडवर रिद्धपूर बसथांब्यापासून गावापर्यंत दुतर्फा दीड किलोमीटर हायमास्ट दिवे लागतील. या ठिकाणी शेगावच्या धर्तीवर उद्यान होणार असून, भाविकांना या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेता येईल. मंदिरापुढे दुकानांसाठी गाळे बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विकासकामांमुळे रिद्धपूरचे रूपडे पालटणार आहे.