शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कचरा २५० टन प्रक्रिया शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:15 PM

शहरामध्ये दररोज २०० ते २५० टन कचरा गोळा होतो. त्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही. शहरवासीयांच्या आरोग्याशी निगडित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अद्यापही मुहूर्त गवसलेला नाही. २०१७-१८ च्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थिती कथन करण्यात आली आहे.

ठळक मुद्देघनकचरा व्यवस्थापन केव्हा? : कचऱ्याचे विलगीकरण कागदावरच
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरामध्ये दररोज २०० ते २५० टन कचरा गोळा होतो. त्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही. शहरवासीयांच्या आरोग्याशी निगडित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला अद्यापही मुहूर्त गवसलेला नाही.२०१७-१८ च्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सद्यस्थिती कथन करण्यात आली आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने अमरावतीकरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. अनेक आजारांना यामुळे निमंत्रण दिले जात असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ओला व सुका असे वर्गीकरण न करता हा कचरा वाहनांद्वारे सुकळी कंपोस्ट डेपोत साठविला जात असल्याने तेथे कचऱ्याचा डोंगर उभा राहला आहे. तेथे सात ते आठ लाख टन कचरा प्रक्रियाविना पडला असून, त्यात दिवसाकाठी निघणाºया २०० ते २५० टन कचºयाची भर पडत आहे.सुकळी येथील कंपोस्ट डेपोची कचरा साठवणीची मर्यादा केव्हाच संपुष्टात आल्याने त्या भागातील रस्त्यावरही कचरा डम्प केला जात आहे. या ढिगामुळे सुकळी आणि लसनापूर येथील ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. दररोज निघणाऱ्या कचऱ्यासह सुकळीत साठवून ठेवलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया न केल्यास तेथेही औरंगाबादप्रमाणे आगडोंब उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची अत्यंत निकड आहे.महापालिका हद्दीत नव्याने समविष्ट झालेल्या गावांमुळे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यात वाढ झाली आहे. सध्या कचऱ्यात ई-कचरा, घनकचरा, अन्नपदार्थ अशा विविध प्रकारच्या कचऱ्याचा समावेश आहे. मृत जनावरेही सुकळी कंपोस्ट डेपोत नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात येते. मागील १५ वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा तारू भरकटला आहे. यंदा घनकचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित न झाल्यास अमरावतीमध्येही कचऱ्याचा प्रश्न पेटण्याची दाट शक्यता आहे. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लागल्याने मोठ्या प्रमाणात साथीचे व जीवघेण्या आजारांचे रोगजंतू पसरू शकतात तसेच सुकळी व लगतच्या काही भागांतील पाण्याचे स्रोतदेखील दूषित होत असल्याचे निरीक्षण महापालिकेने नोंदविलेले आहे. महापालिका प्रशासनाने कचरा प्रश्न सोडवावा, अशी अमरावतीकरांची अपेक्षा आहे. कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंधनकारक आहे.प्रशासकीय मान्यता केव्हा?पर्यावरण विभागाकडे असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे तारू भरकटल्याने यंदा ती जबाबदारी स्वच्छता विभागाकडे देण्यात आली. या विभागाने एजन्सीच्या माध्यमातून ३८ कोटींचा डीपीआर बनविला. मात्र, आमसभेने डिसेंबरमध्येच मान्यता दिलेल्या या प्रकल्पाला नगरविकास विभागाची अद्यापही मान्यता मिळाली नाही. हा प्रकल्प प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात अडकला आहे.मजीप्रा, नीरी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास हिरवी झेंडी दिली आहे. नगरविकासची प्रशासकीय मान्यता अप्राप्त आहे.- अजय जाधववैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) महापालिका