लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते मध्यप्रदेशातील भैसदेही- बैतूल मार्गावर चालणाºया एका खासगी बसमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. बसमधील प्रवासी श्रींची आरती करतात. सध्या ही बस या भागात चर्चेचा विषय ठरली आहे.गणरायांची स्थापना घरोघरी, सार्वजनिक गणेश मंडळांत, शासकीय, निमशासकीय कार्यालयांत, कारखान्यातही होताना आपण बघितले; पण परतवाडा येथील एका खासगी बसचालकाने गाडीतच गणेशाची स्थापना केल्याची ही पहिलीच वेळ असावी, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.बसमधील चालकाच्या कॅबिनमधील बोनेटवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. खडबडीत रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्यामुळे मूर्ती त्याच ठिकाणी राहावी, यासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. गणेशासाठी छोटे मंदिरही येथे तयार करण्यात आले आहे. ही बस दररोज सकाळी १० वाजता भैसदेही येथे पोहोचते. येथील जयस्वाल पेट्रोल पंपावर आरती केली जाते. सायंकाळची आरती परतवाडा येथे केली जाते. यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना प्रसादाचे वितरण केले जाते. बसमध्ये चढणारे व उतरणारे सर्व प्रवासी बाप्पांचे दर्शन घेतात. सध्या ही बस परतवाडा, भैसदेही, बैतूल मार्गावर चर्चेचा विषय ठरली आहे. मार्गावरील प्रवासी व नागरिक ही बस पाहण्यासाठी येत आहेत. चालक बाबू यादव व वाहक आशिष कनाठे हे बाप्पांच्या प्रसादाची सोय आपल्या पैशातून करतात.बसमध्ये स्थापना : प्रवासी करतात पूजा, परतवाडा-बैतूल मार्गावर फेरीही बस आमचे एकप्रकारे घरच आहे. त्यामुळे आम्ही यात गणेशाची स्थापना केली आहे. प्रत्येक प्रवासी कोणत्या ना कोणत्या अडचणीत असतो. श्रीगणेशाला पाहून त्याचा थोडा ताण कमी व्हावा, हादेखील एक हेतू आहे.- आशिष कनाठे, वाहक
मध्यप्रदेश-महाराष्ट्र बाप्पांचा बसमधून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:50 PM