मनीष तसरे- अमरावती : कोरोनाकाळात दोन वर्षापासून वाहतूक बंद असल्याने त्याचा फटका ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना बसला. ट्रॅव्हल्स अनेक दिवस उभ्या ठेवाव्या लागल्यात. अनेकांना वर्क फॉर्म होमची सुविधा कंपन्यानी दिल्यामुळे प्रवासीसंख्यादेखील नगण्य कमी होती.
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. अनेक मार्गांवरील बसफेऱ्या खराब रस्त्यांमुळे आताही बंदच आहेत. सध्या गणेशोत्सवामुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ थोड्याफार प्रमाणात झाली आहे. दोन वर्षे कोरोनाचा फटका बसलेल्या ट्रॅव्हल्स व्यवसायाला गणेशोत्सवाने तारल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांमधून उमटत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
या मार्गावर सर्वाधिक ट्रॅव्हल्स धावतात
------------------
--------------------------------------------------
नागपूर-पूणे ---
नागपुर --नाशिक---
नागपुर-- औरंगाबाद--
नागपूर --इंदौर---
अमरावती -पुणे--
-------------------------------------------------------
भाडे वाढले--
नागपूर-पुणे------------------------१४००-१५००
नागपूर --नाशिक-----------------१२००-१३००
नागपूर-- औरंगाबाद---------------१०००-१०००
नागपूर --इंदूर---------------८००-८५०
अमरावती -पुणे---------------------११००-१२००
------------------------------------------------------------------------
कोट----
ट्रॅव्हल्सचालक
१) दोन वर्षांनंतर बरे दिवस
दोन वर्षांपासून काेरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय तोट्यात आला आहे. घेतलेेले कर्जसुध्दा भरताना ताण सहन करावा लागत आहे. बऱ्याच लोकांनी वाहने उभी केली आहेत. रक्षाबंधनपासून आता जेमतेम प्रवासीसंख्या वाढत असल्याने व्यवहार सुरळीत होत आहे. या दिवाळीत चांगला व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे.
- दिलीप छूटलाणी,
ट्रॅव्हल्सचालक, पंचवटी अमरावती
२) कोरोनाकाळात ट्रॅव्हल्स बंद होत्या. बरीच बंधने होती. त्यामुळे परवडत नव्हते. आता जेमतेम प्रवासी वाढत आहे. सद्यस्थितीत गौरी - गणेशोत्सवामुळे बऱ्या प्रमाणात प्रवासीसंख्या वाढली आहेे. कारोनाची रुग्णांची संख्या वाढली नाही. दिवाळीत बऱ्या प्रमाणात प्रवासीसंख्या वाढेल व व्यवसाय होईल.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
कोेट प्रवासी
१) गौरी -गणेशोत्सामुळे अमरावतीत यायचे हाेते. सध्या ट्रॅव्हल्सचे भाडे अधिक असले तरी घरी उत्सव असल्याने यावेच लागते. सध्या ट्रॅव्हल्स चालक कोरोना नियमांचे पालन करीत आहे.
- रोहित देशमुख,
२) पुण्याहून अमरावतीला घरी यायचे होते. प्रवासीभाडे अधिक असतानाही घरी पोहचणे गरजेचे हाते. त्यामुळे ट्रॅव्हल्सने आले. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रवास झाला.
- सिमल नागापुरे, प्रवासी