लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील मल्हारानजीकच्या काळवीट गावातील खिमू भोगेलाल बेलसरे (२८) या गर्भवती महिलेला डॉक्टरांच्या समन्वयाने जीवदान मिळाले. कमी वजनामुळे अखेरचा श्वास घ्यावा लागला.धामणगाव गढीचे वैद्यकीय अधिकारी अशोक जुमळे आणि चिखलदरा तालुक्यातील मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नीता नागले यांच्या समन्वयातून गर्भवती मातेला वाचविण्याच्या प्रयत्नाला यश मिळाले आहे. खिमू बेलसरे ही गर्भवती महिला तिच्या आईकडे मेळघाटातील भिलखेडा या गावाला गेली होती. त्याठिकाणी तिची प्रकृती बिघडल्याचे गावातील आशा वर्करनी डॉ. नागले यांना कळविले.प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती अधिकच खालावत असल्याचे लक्षात आल्याने डॉक्टरांनी तपासणीअंती ९ जूनला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दहा दिवस घेतलेल्या परिश्रमामुळे आज ती महिला मृत्यूच्या दाढेतून पुन्हा सुखरूप घरी पोहचली आहे. महिलेचे शरीरातील रक्त १० ग्राम झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता नागले यांनी सांगितले. त्या महिलेवर आरोग्य कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.कमी वजनाचे बाळ दगावले, माता सुखरूपडॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पुढील तपासणी करण्याकरिता चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात ६ जून रोजी घेऊन गेले. त्याठिकाणी रक्ताची तपासणी केली असता, त्या गर्भवती महिलेच्या शरीरात फक्त २ ग्राम रक्त असल्याचे उघड झाले. लगेच त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी महिलेला रक्तापुरवठा करून डॉक्टरांनी अमरावतीला हलविले. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यादरम्यान महिलेचे पोट दुखणे सुरू झाले. त्यामुळे डफरीनच्या डॉक्टरांनी प्रसूती केली. मात्र, प्रसूतीदरम्यान बाळ उपजत जन्माला आले आणि मेळघाटात पुन्हा एका कमी वजनाच्या बालकांचे जन्म घेऊन जग पाहण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला.
जीवनमरणाचा मेळघाट ते नागपूर प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:08 PM
अचलपूर तालुक्यातील मल्हारानजीकच्या काळवीट गावातील खिमू भोगेलाल बेलसरे (२८) या गर्भवती महिलेला डॉक्टरांच्या समन्वयाने जीवदान मिळाले. कमी वजनामुळे अखेरचा श्वास घ्यावा लागला.
ठळक मुद्देबाळ दगावले : आदिवासी गर्भवती मातेला जीवदान