शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

एस.टी.ने प्रवास करताय; सॅनिटायझर घेतलाय ना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:10 AM

वाहकांनाच करावे लागते कौन्सिलिंग; प्रवासी मात्र बिनधास्त अमरावती : गतवर्षी कोरोनामुळे विस्कटलेले चक्र रुळावर येत असतानाच पुन्हा एप्रिलपासून कोरोना ...

वाहकांनाच करावे लागते कौन्सिलिंग; प्रवासी मात्र बिनधास्त

अमरावती : गतवर्षी कोरोनामुळे विस्कटलेले चक्र रुळावर येत असतानाच पुन्हा एप्रिलपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. त्याला प्रतिबंध लागावा म्हणून कडक निर्बंध जारी करण्यात आले. अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी.बसेसची सेवा सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे बसमधील गर्दी ओसरली. गत दीड महिन्यापासून प्रवासीसंख्या घटली. शिवाय फेऱ्या कमी झाल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. दीड महिन्यात २० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

कोराेनामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महत्त्वाच्या कामांसाठी जाणाऱ्या प्रवाशांनाच एसटीत प्रवेश दिला जात आहे. गतवर्षी बसमध्ये चढलेल्या प्रत्येक प्रवाशांच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत असे. आता मात्र सॅनिटायझर देणे बंद केले आहे. मात्र, वाहकच प्रवाशांना सॅनिटायझर हाताला लावले काय? हे विचारत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक असतील तर वाहक स्वत:कडील सॅनिटायझर देत आहेत. शिवाय एका सीटवर एकानेच बसावे, मास्क हनुवटीवर नको, नाक-तोंड झाकेल अशा पद्धतीने लावा, असे सांगावे लागतात. वास्तविक एसटीत अन्य प्रवाशांना नाकारण्यात येत असकले तरी खेडेगावातील ज्येष्ठ वयस्कर मंडळींना पर्यायी साधन नसल्याने बसमध्ये प्रवेश द्यावाच लागत आहे. गत दीड महिन्यात फेऱ्या घटल्याने एसटीचे उत्पन्न घटले. आर्थिक भुर्दंड सोसत एसटी प्रवाशांना सेवा देत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.

बॉक्स

ना मास्क, ना सॅनिटायझर

गतवर्षी एसटीत चढणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येत असे. मास्क नसणाऱ्या प्रवाशाला मास्कही दिला जात होता. आता मात्र सॅनिटायझर दिले जात नाही. मास्क हनुवटीला अडकून एसटीत चढणाऱ्या प्रवाशांना वाहकांकडून हटकले जाते.

बॉक्स

२० कोटीचे नुकसान

प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाल्याने दीड महिन्यात अमरावती विभागाचे साधारणपणे २० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. लाॅकडाऊन संपेपर्यत आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागणार आहे.

बॉक्स

प्रवासी घरातच

ब्रेक द चेनअंतर्गत कडक संचारबंदीमुळे अनावश्यक फिरताना आढळल्यास कारवाई होत असल्याने नागरिक घराबाहेर पडणेच टाळू लागल्याने एसटीचे प्रवासी सध्या घरातच आहेत.

बॉक्स

प्रमुख मार्गावर वाहतूक

१)अमरावती विभागातून राज्य परिवहन महामंडळामार्फत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या अन्य प्रवाशांच्या सोईसाठी आजघडीला नागपूर, यवतमाळ, परवाडा, दर्यापूर, वरूड, अकोला मार्गावर एसटी बसेस धावत आहेत..

२)

नागपूर,यवतमाळ,परतवाडा,दर्यापूर अकोला या मार्गावर प्रवासी संख्या समाधानकारक मिळत असल्याने शिवाय येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने बसेस सोडल्या जात आहेत.

३) शासनाकडून खासगी वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले असल्याने एसटीला चांगले दिवस आले होते.मात्र लाॅकडाऊनमुळे एस.टी.चे. अर्थिक चक्र पुन्हा बिघडले आहे.अत्यावश्यक सेवा देत असताना नुकसानही सोसावे लागत आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील एकूण बसेस -३८५

सध्या सुरू असलेल्या बसेस ६०

एकूण कर्मचारी -२५००

सध्या कामावर वाहक-६०

सध्या कामावर चालक-६०

वाहक -८६५

चालक-८००

बॉक्स

बस सुरू झाली अन् जिवात जीव आला

कोट

गत दोन महिन्यांपासून एसटी बस बंद होती. अनेकांना ड्युटी न मिळाल्याने रोजगारही कमी झाला होता. आता बस सुरू झाल्याने जिवात जीव आला. वेतन होणार याची शाश्वती मिळाली आहे. यामुळे डोक्यावरचे टेन्शन कमी झाले.

- बाळासाहेब राणे,

वाहक

डयुटी मिळण्याची प्रतीक्षा अनेकांना होती. रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेतन नसल्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. एसटी सुरू होणे हा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. पूर्वीच्या तुलनेत बसफेऱ्या वाढल्याने समाधानाची बाब आहे.

- ज्ञानेश्र्वर खोंड,

चालक