आॅनलाईन लोकमतअमरावती : ३१ मार्चला सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांनी त्यांची देयके लेखा व कोषागारात सादर करता येणार आहे. दरम्यान, शासकीय कार्यालयांची गैरसोय टाळण्यासाठी ‘गुड फ्रायडे’ या शासकीय सुटीच्या दिवशीही मुख्य कोषागार आणि १२ उपकोषागारांचे कामकाज सुरू असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी यांनी दिली.सर्व शासकीय विभागांमध्ये ‘मार्च एंडिंग’ची लगबग सुरू आहे आपआपल्या विभागाची खर्चाची तसेच इतर विकासकामांची बिले लेखा व कोषागार विभागात सादर करण्यासाठी यंत्रणांची धावपळ दिसून आली. मुख्य लेखा व कोषागारात बिले सादर केली जातात. त्यात काही विभागानी आॅनलाइन पद्धतीनेसुद्धा बिले सादर केली आहे. २९ मार्च रोजी महावीर जयंती, तर ३० रोजी गुडफ्रायडे अशी दिवसाआड सुटी आल्याने शासकीय यंत्रणांमध्ये अस्वस्थता होती. शासनाच्या मार्गदर्शनानुसार ३० मार्चला मुख्य कोषागार विभागाचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर हजर होते. ३१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत मुख्य लेखा कोषगार कार्यालय सुरू असणार आहे. १२ उपकोषागारात देयके सादर करण्यासाठी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे यंत्रणांनी त्यापूर्वी आपली बिले सादर करावी, असे आवाहन कोषागार विभागातर्फे करण्यात आले आहेसेवानिृवत्तांना उशिरा मिळेल पेन्शनजिल्हा कोषागार कार्यालयात सध्या ‘मार्च एंडिंग’ची लगबग सुरू आहे. त्यामुळे दर महिन्याच्या १ तारखेला सेवानिवृत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन ही यावेळी ४ एप्रिलनंतर त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे २८ हजारांवर पेन्शनधारक आहेत. त्यांना यावेळी पेन्शनची रक्कम चार दिवस विलंबाने दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा कोषागार विभागाच्या सूत्रांनी दिली.मार्च एंडसाठी झीरो पेंडन्सी धोरणमार्च एंडसाठी झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल पद्धतीनुसार काम करण्याच्या सूचना कर्मचाºयांना देण्यात आल्या आहेत. देयके दररोज निकाली काढले जात आहेत. उपकोषागार कार्यालयात ३१ मार्चला सांयकाळी ६ वाजेपर्यंत, तर मुख्य कार्यालयात मार्चच्या रात्री १२ ेपर्यत बिले स्वीकारली जातील.सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा ३१ मार्च हा शेवटचा दिवस आहे. या वर्षातील सर्व आर्थिक व्यवहार पूर्णत्वासाठी कामकाज सुरू आहे. कर्मचारी अधिक श्रम घेत असून, ‘मार्च एंड’साठी सज्ज आहेत.- पंकज शिरभातेमुख्य कोषागार अधिकारी
सहाच्या आत कोषागारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:25 PM
३१ मार्चला सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध शासकीय यंत्रणांनी त्यांची देयके लेखा व कोषागारात सादर करता येणार आहे. दरम्यान, शासकीय कार्यालयांची गैरसोय टाळण्यासाठी ‘गुड फ्रायडे’ या शासकीय सुटीच्या दिवशीही मुख्य कोषागार आणि १२ उपकोषागारांचे कामकाज सुरू असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी यांनी दिली.
ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत कामकाज : देयके सादर करण्यासाठी शनिवार डेडलाईन