शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

ठिकठिकाणी वृक्ष कोसळले

By admin | Published: April 09, 2015 12:23 AM

बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत कडाक्याचे ऊन तापले होते. त्यानंतर आकाशात ढगांची गर्दी झाली आणि पावसाची लक्षणे दिसू लागली.

अमरावती : बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत कडाक्याचे ऊन तापले होते. त्यानंतर आकाशात ढगांची गर्दी झाली आणि पावसाची लक्षणे दिसू लागली. सोबतच सोसाट्याचा वारा सुटला. धुळीचे लोट आसमंतात पसरले. वादळाची तीव्रता प्रचंड असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची त्रेधा उडाली. होर्डींग्ज, बॅनर तुटून रस्त्यावर येऊन पडले. काही ठिकाणी झाडे पडली. नवाथेनगर, न्यू प्रभात कॉलनी, पोलीस लाईन, स्वस्तीकनगर, श्रीकृष्ण पेठच्या वळणावरील एका शो रूमच्या काचेचे फ्रेमिंग रस्त्यावर येऊन पडले. या काचा इस्तत: पसरल्या. या काचांनी मार्गावरून ये-जा करणारे काही लोक जखमी झाले. या शो-रूमच्या खाली असलेल्या दुचाकी दुरूस्तीच्या दुकानात दुचाकी सुधरविण्यासाठी आलेल्या नसीब खाँ हमिद खां (५५, ताजनगर) याच्या अंगावर काचा पडल्याने तो जखमी झाला. अन्य जखमींमध्ये रसवंती चालक राम उजागर (२७), रामकरण लोधी (११), राहुल रामनिवास लोधी (१०), सुनील लोधी (१४), रामकरण देविकर (३८), अनंत लक्ष्मण राक्षसकर (३६,रा. रमाबाई आंबेडकरनगर), धिरजसिंग रणजितसिंग कटारिया (२२, कपिलवस्तू नगर) यांचा समावेश आहे. अग्निशमन दलाचे अधीक्षक भरतसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनात शहरातील आपात्कालिन स्थितीचा सामना करण्याकरिता सय्यद अन्वर, दिलीप चौखंडे व पथकाने ठिकठिकाणी पोहोचून मदत कार्य वेगाने सुुरू केले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळली. अमरावती-बडनेरा मार्गावरील साईनगर परिसरात दोन मोठी झाडे उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही. शहरात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळल्याची माहिती आहे.१२ एप्रिलपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊसबुधवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. येत्या १२ एप्रिलपर्यंत पावसासाठी अनुकुल स्थिती असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. पश्चिम मध्यप्रदेश ते आसामपर्यंत कमी दाबाची स्थिती असून त्यांच्या योगाने पश्चिम बंगाल व बांग्लादेशावर चक्राकार वारे वाहत आहेत. जम्मू-काश्मीरवर पश्चिमी विक्षेप संक्रिय आहे. त्यातच पंजाब व पाकिस्तानच्या दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे व हिंदी महासागरात ढगांची गर्दी आहे. ही सर्व परिस्थिती पावसासाठी अनुकूल असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविला आहे. त्यामुळे येत्या १२ एप्रिलपर्यंत विदर्भातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.