नवसंकल्पना : वृक्षारोपणासाठी आता मोबदलाअमरावती : वृक्षाचे सरंक्षण व संवर्धन स्वेच्छेने करण्यासाठी राज्यात वृक्षगुण (ट्री के्रडीट) ही नवसंकल्पना रुजविण्याचा मानस राज्य शासनाचा आहे. वनाच्छदानात लोकसहभाग वाढावा, आणि अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी, यासाठी राज्यातील लोकांना योग्य नियतकलीन आर्थिक मोबदला मिळवून देण्यासाठी ही अभिनव संकल्पना निर्माण करण्यात आली आहे.सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षण तथा सामाजिक वनीकरणाचे महासंचालक तसनीम अहमद यांनी २९ डिसेंबर २०१५ ला 'ट्री क्रेडीट' या संकल्पनेसंदर्भात वनमंत्र्यांसमोर सादरीकरण केले होते. त्या अनुषंगाने वनाच्छदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी 'ट्री क्रेडिट' या संकल्पनेची राज्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्वंकष प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षण (वनबल प्रमुख) यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र वनविकास महामंडळ मर्यादित नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर हे सदस्य तर तसनीम अहमद या अशासकीय सदस्य राहतील. याशिवाय मुख्य वनसंरक्षण (प्रादेशिक अमरावती) हे सदस्य सचिव आहेत. या समितीला ६ सप्टेंबरपर्यंत 'ट्री क्रेडिट'संदर्भात सर्वंकष प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महसूल व वनविभागाने दिल्या आहेत. (प्रतिनिधी)
वृक्ष संवर्धनासाठी 'ट्री क्रेडिट'!
By admin | Published: June 11, 2016 12:11 AM