लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : येथील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका कॉम्प्लेक्ससमोर असलेल्या जुन्या वृक्षाची नियमबाह्य कत्तल करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला. त्याबाबत पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.तिवसा बसस्थानकाजवळ कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालयालगत कॉम्प्लेक्सचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यासमोर असलेल्या २० वर्षाच्या महाकाय वृक्षाची कत्तल विनापरवानगी करण्यात आली. तिवसा नगरपंचायत व आयआरबीच्या हद्दीत येत असलेल्या त्या झाडाची कत्तल करण्यापूर्वी राठी नामक त्या कॉम्प्लेक्समालकाने कुठलीही परवानगी घेतली नाही. सोमवारी रात्री झाडांची कत्तल सुरू असताना ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने घटनास्थळ गाठले. वृक्षकत्तलीचे छायाचित्र काढल्याचे संबंधितांच्या लक्षात येताच वृक्ष मुळासकट उपटण्याचा प्रकार थांबला. नगरपंचायत प्रशासन व आरआरबी संबंधित इमारतमालकाविरुद्ध कुठली कारवाई करते, याकडे तिवसावासीयांचे लक्ष लागले आहे. राज्यभर ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न होत असताना खासगी संकुलधारकाने विनापरवानगी केलेली वृक्षतोड तिवसा शहरातील नागरीकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.वृक्षतोडीची परवानगी आमच्या विभागाकडून दिली जात नाही. तो विषय वनविभागाच्या अखत्यारीतील आहे. याबाबत माहिती घेता येईल.- रवि महाले,तहसीलदार, तिवसातो वृक्ष महामार्गाच्या अखत्यारीत असेल, तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला हवी. यात स्थानिक वनविभागाकडून माहिती घेऊ.- अशोक कविटकर, उपवनसंरक्षक, अमरावतीवृक्षतोडीबाबत परवानगी मागण्यात आली नाही. महामार्ग व नगरपंचायतच्या हद्दीत संबंधित वृक्ष आहे. संबंधितांनी वनविभागाची परवानगी घेतली असावी.- विलास ब्राम्हणकर,राज्य महामार्ग, अमरावती
राष्ट्रीय महामार्गावर वृक्षाची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:54 PM
येथील अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर एका कॉम्प्लेक्ससमोर असलेल्या जुन्या वृक्षाची नियमबाह्य कत्तल करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी उघड झाला. त्याबाबत पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देवृक्षलागवड योजनेचा बट्ट्याबोळ : ‘आशीर्वाद’ कुणाचा?