शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

झाडे हिरवीगार; पण वांझोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:29 PM

यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला.

ठळक मुद्देशेंगाच नाहीत : सदोष बियाणे, कीड, रोगही ठरताहेत कारणीभूत‘मल्टिपल कॉम्प्लेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात जून महिन्यात पावसाच्या प्रदीर्घ दडीने निर्माण झालेल्या ‘मल्टीपल काम्ॅपलेक्स फॅक्टर’ने सोयाबीनचा घात केला. वाढ खुंटली, झाड हिरवेगार दिसत असतानाही सोयाबीन वांझोटे राहिले आहे. सदोष बियाणे, कीड व रोगांचा प्रादुर्भाव देखील सोयाबीनच्या मुळावर उठला आहे. जिल्ह्यात किमान एक ते दीड लाख हेक्टरमधील सोयाबीनला शेंगाच आल्या नसल्याने शेतकºयांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.यंदाच्या हंगामात जिल्ह्यात तीन लाख २३ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत दोन लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. मात्र, जून महिन्यात मृग नक्षत्रापासूनच पावसाने प्रदीर्घ दडी दिली आहे. नंतरही दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली. सुरूवातीच्या काळात तीन आठवडयाचा पावसाच्या खंडाचे परिणाम आता सोयाबीनवर जाणवायला लागले आहेत. झाड हिरवेगार असूनही त्यावर फुले व शेंगा पकडल्याच नाहीत. सदोष बियाण्यांमुळे ‘मोझॅक’चा प्रादुर्भाव झाला. झाड हिरवे दिसते. मात्र, त्यातुलनेत झाडाला शेंगा कमी प्रमाणात लागतात. त्याही खुरटलेल्या व पोचट असतात. या शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत. सद्यस्थितीत प्रतिकूल हवामानामुळे अळीचा ‘अटॅक’ आहे. ही अळी सोयाबीनची फुले खात असल्याने झाड हिरवे दिसत असले तरी झाडाला शेंगाच लागत नाहीत. आदी कारणांमुळे सोयाबीन पिकावर सध्या आरिष्ट ओढवले आहे. सोयाबीनवरील विषाणू, जिवाणूजन्य रोग, झाडाला नत्र, पलास यांसह ईतर अन्नद्रव्याची कमतरता, पानांवरील बुरशीजन्य ठिपके, मूलकूज, खोडकूज, करपा, अ‍ॅन्थ्रन्कोज व तांबेरा आदी रोग व कीडींमुळे सोयाबीनला एकतर शेंगा लागत नाहीत, लागल्या तर त्या पोचट राहत आहेत. यामुळे शेतकºयांनी वेळीच व्यवस्थापन न केल्यास सोयाबीनचे २५ ते ९० टक्के नुकसान होण्याची शक्यता आहे.काय आहे ‘मल्टिपल कॉम्प्लेक्स फॅक्टर ?शेतकºयांनी जून महिन्यात सोयाबीनची पेरणी केली. मात्र, २७ दिवस पावसाचा खंड असल्याने पिकांची वाढ खुंटली. फुले धरलीच नाहीत. पावसाच्या ताणामुळे झाड हिरवेगार दिसत असले तरी शेंगा मात्र कमी आहेत. नंतर झाडांवर फुले येत असली तरी पुढे मान्सून विड्रॉल होत असल्याने तसेच शेंगा परिपक्वहोण्यास ४० दिवसांचा कालावधी लागत असल्याने संरक्षित सिंचनाची सुविधा असल्यासच काही प्रमाणात उत्पादन घेता येईल. मात्र, जिरायती क्षेत्रात याची शक्यता नाही. जुलै महिन्यात पेरणी झालेल्या पिकांवर याचा जास्त प्रभाव नसल्याची माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली. हासर्व ‘मल्टीपल कॉम्प्लेक्स फॅक्टरचा’ प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले.बाष्परोधक ‘पोटॅशियम नायटेÑट’ची फवारणी आवश्यकअशा प्रतिकूल परिस्थितीत पावसाचा ताण असल्यास झाडावरील शेंगा टिकविण्यासाठी बाष्परोधक पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आवश्यक आहे. १३:०:४५ हे एक किलो मात्रेमध्ये १०० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हे पोटॅशियम बाष्परोधक असल्यामुळे उन्हापासून सोयाबीनचा बचाव होतो व किमान १५ दिवसांची मुभा मिळते. नायट्रोजन व पालाश शेंगा भरण्यास मदत करतात. झाडांची तहान भागवितात, अशी माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिली.