आॅनलाईन लोकमतचांदूर बाजार : तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षकटाई सुरू असून संबंधित वनविभाग व महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तालुक्यातील विविध ठिकाणी असलेल्या आरामशीनवर लाकडांचे मोठे-मोठे ओंडके अवैध वृक्षतोडीची साक्ष देत आहेत.अवैध वृक्षकटाई करणारे व्यापारी शेतकऱ्यांच्या आर्थिक टंचाईचा फायदा घेऊन कमी दराने शेतीमधील अशा प्रकारचे वृक्ष विकत घेऊन व कोणतीही संबंधित कार्यालयाची परवानगी न घेता झाडे रातोरात कापून वाहनाने घेऊन जातात. चांदूरबाजार शहरालगतच नानोरी, सोनोरी जुन्या मार्गावर निर्माण होणाºया विद्युत उपकेंद्राजवळ लागून असणाºया शेतामध्ये जवळपास ५० ते ६० वर्षांचे वय असणारे वडाच्या झाडाच्या फांद्या कापल्या आहेत. अमरावती मार्गावरील गॅस एजन्सीकडे जाणाऱ्या मार्गावरील लेआऊटमधील १५ ते २० निंबाचे झाडे कापण्यात आलीत. तालुक्यातील हैदतपूर जंगलाच्या परिसरात धुऱ्यावर असणारे असेच निंबाचे व इतर वृक्षाचे झाडे तोडण्यात आले आहे. ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, थुगाव, आसेगाव परिसरातील आणि परिसरातील शेताच्या धुºयावरील वृक्षकटाई सुरू असल्याची चर्चा आहे.उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले वृक्षतोडीचे अधिकारी कमी करून वृक्ष कापण्याची परवानगी देण्याचे अधिकार शासनाने वन विभागाला दिले आहे. वनविभागात कर्मचारी वर्गाची कमतरता असल्यामुळे वनविभाग वृक्ष कटाईवर लक्ष ठेवू शकत नसल्याचे चित्र आहे. कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे जणूकाही तालुक्यात अवैध वृक्षकटाईला उधाण आल्याचे दिसत आहे.
चांदूर तालुक्यात वृक्षतोड जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:41 AM
तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षकटाई सुरू असून संबंधित वनविभाग व महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : तालुक्यातील आरा मशीनवर लाकडांचा ढीग