लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत घटांग परिक्षेत्रातील बिहाली बीटमध्ये प्रचंड वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वनविभागाने मंगळवारी तिघांना ताब्यात घेतले. त्यांना अचलपूर येथील न्यायालयात हजर केले असता, ८ नोव्हेंबरपर्यंत त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्या तस्करांनी सांगितल्यावरून परतवाड्यातील काही फर्निचर विक्रेत्यांच्या दुकानावर धाडसत्र टाकणे सुरू होते.घटांग वनपरिक्षेत्रातील बिहाली वर्तुळात जवळपास अडीच लाखांचे १७ सागवान वृक्ष कापल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी वनविभागाने अनिल मनीराम जामुनकर (२४), राजेश भुसूम, बाबूलाल भुसूम (रा.कोहाना) यांना ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी अचलपूर येथील न्यायालयात हजर केले असता, वनकोठडी सुनावली गेली. घटांग वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने पूर्वीच प्रकाशित केले होते. जारिदा येथील अवैध वृक्षतोडप्रकरणी चार दिवसांपूर्वी वनपाल, वनरक्षकाला निलंबित करण्यात आले. ही कारवाई पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पºहाड यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी निशा मोकासे, वनपाल सुधीर हाते, विजय बारब्दे, पी.व्ही. अळसपुरे, मेटकर, प्रतीक चावरे, विजय गोंडचोर, कविता भोरे, विनोद अधवाल, संदीप चौधरी, राजू भाकरे, खांडेकर, आर.बी. महल्ले तंतरपाळे, विजय गुलेरीकर यांच्या पथकाने केली.मेळघाटच्या पायथ्याशी परतवाडा शहर असल्याने पूर्व मेळघाट वनविभागाच्या जंगलातून मोठ्या प्रमाणात सागवानच्या चरपटा व इतर साहित्य तस्कर शहरातील काही फर्निचर विक्रेत्यांना आणून देतात. बिहारी जंगलातील सागवान तस्करी मोठ्या प्रमाणात होत असताना, हा माल ज्या फर्निचर विक्रेत्यांसह त्यांच्या कारखान्यांवर तस्कर देत होत, त्यांची नावे दिल्याने वनविभागाने चौकशी सुरू केली आहे. वृत्त लिहिस्तोवर धाडसत्र सुरू होते. संपूर्ण माहिती वनविभागाच्यावतीने गोपनीय ठेवण्यात आली, हे विशेष.बिहाली परिसरातील जंगलात अवैध सागवान वृक्षतोड करून विकणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या चौकशीअंती परतवाडा शहरातील काही दुकानांची चौकशी सुरू केली आहे.- अशोक पऱ्हाड,सहायक वनसंरक्षक,पूर्व मेळघाट चिखलदरा
सागवान झाडांची प्रचंड वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 10:23 PM
पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत घटांग परिक्षेत्रातील बिहाली बीटमध्ये प्रचंड वृक्षतोड झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी वनविभागाने मंगळवारी तिघांना ताब्यात घेतले. त्यांना अचलपूर येथील न्यायालयात हजर केले असता, ८ नोव्हेंबरपर्यंत त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
ठळक मुद्देतिघांना अटक : घटांग परिक्षेत्र, वनविभागाचे परतवाड्यात धाडसत्र