शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

आदिवासी विकास विभाग ‘जेम’मधून खरेदीसाठी अव्वल; वस्तू, सेवांसाठी पोर्टल विकसित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 5:22 PM

राज्याचे आदिवासी विकास विभागाचे कार्यालये, शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहे, एकलव्य निवासी शाळा आदींसाठी आवश्यक वस्तू, सेवा खरेदी ही केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस (जेम) पोर्टलवरून करण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती : राज्याचे आदिवासी विकास विभागाचे कार्यालये, शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहे, एकलव्य निवासी शाळा आदींसाठी आवश्यक वस्तू, सेवा खरेदी ही केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस (जेम) पोर्टलवरून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अन्य विभागाच्या तुलनेत आदिवासी विकास विभाग अव्वल ठरला आहे.केंद्र सरकारने आदिवासी विकास विभागात राष्ट्रीय खरेदी धोरणांतर्गत खरेदी प्रक्रियेत बदल केले आहे. शासकीय विभाग, संस्थांना वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी ‘जेम’ पोर्टलवरच स्वीकृती नोंदविण्याचे बंधन आहे. त्यानुसार राज्याच्या आदिवासी विकास विभागाने ‘जेम’मधून खरेदी करण्यासाठी ९ नोव्हेंबर २०१७ रोजी शासन निर्णय जारी करून शिक्कामोर्तब केले आहे. आता खरेदी करताना विभागाच्या गरजेनुसार निविदा फॉर्म, वस्तुनिहाय विनिर्देशामध्ये बदल करण्याची मुभा आहे. ‘जेम’ पोर्टलमध्ये राबविण्यात येणारीे खरेदी पद्धत ही मानवी हस्तक्षेपाशिवाय असून ती संपूर्णत: आॅनलाईन आहे. त्यामुळे खरेदी कार्यपद्धतीत पारदर्शकता येऊन नेमक्या व योग्य नामांकित दर्जाच्या वस्तुंचा पुरवठा वाजवी किंमतीत उपलब्ध होईल, असा विश्वास शासनाला आहे. नव्या खरेदी पद्धतीने कालावधीत बचत, उत्कृष्ट वस्तूंचा पुरवठा, वाजवी किंमत व संपूर्ण खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येईल. ‘जेम’मधून वस्तू, सेवा खरेदीसाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांना नोंदणी, ई-मेल, खरेदीदाराचे नाव, विभागप्रमुख, बँक खाते क्रमांक, देयके अदा करणारी यंत्रणा आदी इत्थंभूत माहिती आॅनलाईन पाठविण्याचे शासनाने निर्देश दिलेत. मात्र, ‘जेम’मधून वस्तू, सेवा खरेदीला प्रारंभ करणारा आदिवासी विकास विभाग अव्वल ठरला आहे.

तीन लाखांच्या आत स्पर्धात्मक निविदेशिवाय खरेदीकार्यालयात ५० हजार ते तीन लाखांच्या आत वस्तू, सेवा खरेदी करण्याची मुभा स्पर्धात्मक निविदेशिवाय देण्यात आली आहे. मात्र, ‘जेम’ पोर्टलवर त्या वस्तू उपलब्ध नसल्यास खरेदी करता येईल. आर्थिक वर्षात तीन लाखांपेक्षा जास्त खरेदी नसावी, ही अट आहे.

‘‘ गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेक्स या कार्यपद्धतीवरून वस्तू व सेवा खरेदी नोंदणीसाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश आहे. आता तर आदिवासी विकास विभागाने स्वतंत्र शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे आता ‘जेम’मधून खरेदी अनिवार्य आहे.- किशोर गुल्हाणे,उपायुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती