लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: धूलिवंदनानंतर मेळघाटातील आदिवासींमध्ये धूम सुरू झाली आहे फगव्याची. या पारंपरिक उत्सवात पुढील पाच दिवस मेळघाटातील मुख्य रस्त्यांवर गैरआदिवासी (जांगडी) यांना अडवून फगवा अर्थात पैशांसाठी गीत-संगीताच्या तालावर मनधरणी केली जाणार आहे. आदिवासी पुरुष व महिलादेखील फगव्यासाठी रस्ता, वाहने अडवित असून, आदिवासी पारंपरिक गीत-संगीताचे माधुर्य या काळात आसमंतात पसरले आहे.
आदिवासींचा फगवा आला रंगात...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 1:02 PM