शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

आदिवासी गोवारी बांधवांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 10:10 PM

गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंडगोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वा$ळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी गेला. राज्य शासनाने या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील दहा हजार आदिवासी गोवारी बांधवांनी जिल्हा कचेरीवर धडक मूक मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्याग्रह आंदोलन केले. यादरम्यान सायन्स कोअर मैदानावरून निघालेल्या मूक मोर्चात तीन किलोमीटरपर्यंत रांग होती.

ठळक मुद्देमूक मोर्चा : उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा; आरडीसींना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गोवारी जमात ही आदिवासी आहे. गोंडगोवारी ही जातच अस्तित्वात नसल्याचा निर्वा$ळा उच्च न्यायालयाने देऊन तब्बल दोन महिन्यांचा कालावधी गेला. राज्य शासनाने या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी केली नसल्याने शुक्रवारी जिल्ह्यातील दहा हजार आदिवासी गोवारी बांधवांनी जिल्हा कचेरीवर धडक मूक मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्याग्रह आंदोलन केले. यादरम्यान सायन्स कोअर मैदानावरून निघालेल्या मूक मोर्चात तीन किलोमीटरपर्यंत रांग होती.राज्यातील आदिवासी गोवारी समाज हक्काचा लढा अनेक वर्षापासून लढत आहे. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ११४ गोवारींचे बळी जाऊनही शासनाने गोवारी समाजाचा प्रश्न सोडविला नाही. त्या अनुषंगाने हायकोर्टात प्रकरणसुद्धा दाखल केले होते. अखेर १४ आॅगस्ट २०१८ रोजी गोवारी हे आदिवासीच असल्याबाबतचा निर्णय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला. या निर्णयानंतर गोवारी समाजाला बऱ्याच वर्षांचा संघषार्नंतर न्याय मिळाला आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी राज्य शासनाने करावी, या मागणीसाठी आदिवासी गोवारी समन्वय समितीच्यावतीने राज्यभर सत्याग्रह आंदोलनांचा दुसरा टप्पा पार पडला. इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आबेडकर व राणी दुर्गावती यांच्या पुतळ्याला मोहन राऊत, पुंडलिक चामलोट, मारोतराव वाघाडे, भाऊराव चौधरी यांनी हारार्पण केले. त्यानंतर हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. यावेळी आदिवासी गोवारी समन्वय समितीचे देविदास बासकवरे, सुदर्शन चामलोट, रामभाऊ शेंदरे, मंगेश ठाकरे, उत्तमराव ठाकरे, रावसाहेब नेवारे, संजय नेवारे, रामभाऊ शेंदरे, मनोहर अरतपायरे, नंदू सहारे, कृष्णा चौधरी, मंगेश ठाकरे, उत्तमराव ठाकरे, रावसाहेब नेवारे , रामकृष्ण भाले, मंगेश चौधरी, बंडू राऊत, शंकर नेवारे, मंगेश राऊत, रघुनाथ नेवारे, किशोर सहारे, नंदू शहरे, विनायक नेहारे, दीपक नेवारे, शंकर सहारे, पंकज नेहारे, मोहन सहारे, गणेश नेवारे, शिवाजी बरडे, प्रकाश शेंदरे, प्रशांत सोनवने आदी उपस्थित होते.