लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : वीटभट्टीवर आपल्या वडिलांसोबत राहणाऱ्या ११ आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात मुख्याध्यापकांनी आणले. त्यांचे आता रीतसर शिक्षण होणार आहे.वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या वकनाथ येथे जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळा आहे. वर्धा नदीचा काठ असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत. मुख्याध्यापक डोंगरे यांना या वीटभट्ट्यांच्या परिसरात काही चिमुकले खेळताना दिसली. याबाबत चौकशी केली असता, या आदिवासी मुलांचे आई-वडील विटा तयार करण्याचे काम करीत असल्याचे स्पष्ट झाले. खाण्याची भ्रांत, तेथे शिक्षण कुठले? मात्र, मुख्याध्यापक प्रमोद डोंगरे यांनी या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले व त्यात यशही मिळविले. अक्षरे गिरवित असलेल्या ११ मुलांपैकी नऊ बºहाणपूर येथील, तर दोन धारणी तालुक्यातील मूळ रहिवासी आहेत. यात पाच मुली आहेत. गटशिक्षणाधिकारी सुषमा मेटकर, केंद्रप्रमुख गौतम गजभिये, बालरक्षक वैभव सरोदे, मुख्याध्यापक प्रमोद डोंगरे यांनी या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला. मुख्याध्यापक डोंगरे यांनी मुलांना पुस्तके, बूक, पेन, कपडे दिले. यावेळी सरपंच दिलीप बमनोटे, समितीचे अध्यक्ष दीपक घायवट यांनी सहकार्य केले. योगेश खवले, किशोर पेंदाम, वनिता वानखेडे यांनी विशेष प्रयत्न केले.
‘ते’ आदिवासी विद्यार्थी अखेर शिक्षणाच्या प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 9:32 PM
वीटभट्टीवर आपल्या वडिलांसोबत राहणाऱ्या ११ आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात मुख्याध्यापकांनी आणले. त्यांचे आता रीतसर शिक्षण होणार आहे.
ठळक मुद्देमुख्याध्यापकांची जिद्द फळाला : ११ पाल्यांपैकी पाच मुली