लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटच्या आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये जिल्ह्याबाहेर प्रवेश देण्यास पालकांचा नकार आहे. जिल्ह्याबाहेर प्रवेश नको, अन्यथा पाल्यांचे प्रवेश काढू, असा इशारा पालकांनी दिला. अपर आयुक्त गिरीश सरोदे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जयंत देशमुख यांना बुधवारी निवेदन देऊन विद्यार्थ्यांची कैफियत मांडली.चिखलदरा, धारणी तालुक्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याबाहेरील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश दिले आहेत. वाशिम जिल्ह्याच्या रिसोड व देगाव येथील भावना पब्लिक स्कूलमध्ये मेळघाटातील ५५ आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांशी भेदभाव, शिक्षकांकडून सापत्न वागणूक, जेवणाची अपुरी व्यवस्था, एकच गणवेश अशी अनेक गाºहाणी पालकांनी मांडली. भावना पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्याचे प्रवेश नको, अन्यथा एकही विद्यार्थी जाणार नाही, असे निवेदनातून गिरीश सरोदे व जयंत देशमुख यांच्याकडे पालकांनी भूमिका मांडली. यावेळी दानजी कंगाले, कालूृ बेठेकर, राजू कवडे, सुंदरलाल मावस्कर, सुरेश बेठेकर, सुखलाल चतुर, केडे सावलकर व अन्यायग्रस्त पालक उपस्थित होते.शासनाकडून आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. निधीचा सदुपयोग होत नसेल, तर ही बाब गंभीर आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर प्रवेश नको.- जयंत देशमुख शिक्षण सभापती, झेडपीमेळघाटातील मुलांना बाहेर ठिकाणी शिक्षणासाठी पाठवून त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. त्याऐवजी याच ठिकाणी सीबीएसई पॅर्टन शाळा सुरू करावी.- महेंद्रसिंह गैलवारसदस्य, जिल्हा परिषद
मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना जिल्ह्याबाहेर प्रवेश नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 9:59 PM
मेळघाटच्या आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये जिल्ह्याबाहेर प्रवेश देण्यास पालकांचा नकार आहे. जिल्ह्याबाहेर प्रवेश नको, अन्यथा पाल्यांचे प्रवेश काढू, असा इशारा पालकांनी दिला. अपर आयुक्त गिरीश सरोदे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती जयंत देशमुख यांना बुधवारी निवेदन देऊन विद्यार्थ्यांची कैफियत मांडली.
ठळक मुद्देनामांकित शाळा : विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा नसल्याची पालकांची तक्रार