प्रशासनाची तत्काळ दखल, हाताला काम देण्याची मागणी
चिखलदरा : ‘हाताला काम द्या’ या मागणीसाठी तालुक्यातील अतिदुर्गम खडीमल येथील आदिवासींनी थेट पंचायत समितीचे कार्यालय गाठले. त्यांना दोन दिवसांत काम देऊ, असे आश्वासन देण्यात आले.
दिवाळीनंतर आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने शहरी भागात पीक कापणीसाठी स्थलांतरित होतात. दुसरीकडे काही आदिवासी पाठीवर बि-हाड घेऊन परिवारासह निघतात. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात शहरी भागातही शेतीची कामे वगळता इतर कामे नाहीत. दुसरीकडे मेळघाटात मग्रारोहयो अंतर्गत आदिवासींसाठी कामाचा सेल्फ तयार ठेवण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अतिदुर्गम खडीमल येथील काही आदिवासी पंचायत समिती कार्यालयात आले होते. त्याची तत्काळ दखल खंडविकास अधिकारी प्रकाश पोळ व परिसरातील सदस्य नानकराम ठाकरे यांनी घेतली. मग्रारोहयो अंतर्गत तालुक्यातील आदिवासी मजुरांना सर्वच ग्रामपंचायतीमार्फत जास्तीत जास्त कामे उपलब्ध करुन दिली जात आहे. येथे दोन दिवसांत मजुरांच्या हाताला काम दिले जाईल, अशी माहिती येथील गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिली.
-----------------