फोटो - जावरे २४ पी
चिखलदरा : शासनाच्या विविध योजनांचा आदिवासींना लाभ मिळण्याच्या दृष्टीने चिखली जिल्हा परिषद सर्कलमध्ये विविध विकासकामे जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे यांच्या पाठपुराव्याने मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत.
मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी शासकीय योजनांचा लाभ थेट मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे (राणावत) या स्वतः पावसाळ्यात प्रत्यक्ष गावात जाऊन समस्या ऐकून घेतात व तात्काळ निवारणासाठी प्रयत्न करतात. मेळघाटात शासनातर्फे विविध योजनांमार्फत विकासकामांसाठी येणाऱ्या निधीमध्ये अंगणवाडी, केंद्र शाळा, आवारभिंत, समाजमंदिर, रस्ते तसेच ग्रामपंचायतमार्फत विविध विकासकामे केली जात आहेत. चिचखेडा येथे काँक्रीट रस्त्याचे, तर अंबापाटी येथे शाळेच्या नवीन वर्गखोलीच्या बांधकामाचे भूमिपूजनसुद्धा नुकतेच जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते महेशसिंह सोमवंशी, सरपंच आशय साकोये, दिलीप चव्हाण, संजू, रमेश सूर्यवंशी, उपसरपंच राजू कासदेकर, बाबा धांडे, गोकुल सूर्जे, रवि कसदेकर, सचिन झडेकर, गौरीशंकर वाघमारे, शाखा अभियंता राहुल शेंडे ,अमर शेंडे, श्रीराम मुघल यांच्या उपस्थितीत झाले.