पान २ ची लिड
फोटो : माटे सरांना माहित आहे.
अमरावती : शहरातील बेशिस्त वाहतुकीत 'सिंहाचा वाटा’ उचलणाऱ्या ट्रीपल सीट दुचाकीचालकांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. पोलिसांच्या दंडात्मक कारवाईकडे बेशिस्त वाहनचालक दुर्लक्ष करीत असल्याचे गेल्या सात महिन्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट आहे. या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ९२ हजार वाहनचालकांवर कारवाई केली आहे. त्यात चार हजारांपेक्षा अधिक ट्रीपल सीट वाहनचालक आहेत.
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांमुळे शहरात वाहतुकीची कोंडी होते. त्याचबरोबर अपघांताचाही धोका वाढतो. वाहनधारकांनी स्वयंशिस्त पाळावी आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येते. मात्र, त्यानंतरही दररोज वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांना ठेंगा दाखवत नियम पायदळी तुडविले जातात. अलीकडे इंधनाचा खर्च वाचविण्यासाठी ट्रीपल सीट वाहने चालवली जातात. हे चित्र महाविद्यालयीन परिसरात हटकून दिसते. अनेक विद्यार्थी सुसाट वेगाने ट्रीपल सीट जातात. समोरच्या चौकात वाहतूक पोलीस दिसले की, मागचा मागेच उतरून काही अंतर चालत येतो. पोलीस नजरेआड गेले, की पुन्हा दुसऱ्याच्या मागे तिसऱ्याला बसवून बेदरकारपणे वाहने हाकली जातात.
////////////
दुचाकीस्वारांनो, पाळा ना नियम!
दुचाकीस्वारांना वाहतूक नियमांची माहिती असणे तेवढेच गरजचे आहे. डावी - उजवीकडे वळताना हाताचे इशारे दिले पाहिजेत. प्रखर दिवे न वापरता दुचाकीचा वेग नियंत्रित असावा. हेल्मेट वापरावे. हेड लाईट, ब्रेक लाईट, इंडिकेटर वेळोवेळो तपासा. दोनपेक्षा जास्त व्यक्तीनी प्रवास करू नये. मोबाईलवर बोलत बाईक चालवू नये. आपले कपडे व इतर वस्तू वाहनाच्या चाकात किंवा अन्य भागात अडकणार नाहीत, याची खबरदारी घ्या. लहान मुलांना टाकीवर बसवू नका किंवा बॅक सीटवर उलटे बसवू नका.
//////////////////
कोट
बेशिस्त वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने निरंतर कारवाई केली जात आहे. वाहनचालकांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. सात महिन्यांत चार हजारांपेक्षा अधिक ट्रीपल सीट वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
- अनिल कुरळकर, पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग
/////////////
अशी झाली ट्रिपल सीट चालकांवर कारवाई
महिना : वाहनधारक
जानेवारी : ७०६
फेब्रुवारी : ४४७
मार्च : ४५४
एप्रिल : ४९३
मे : ४४८
जून : ८४२
जुलै : ६९७
एकूण : ४,०८७
///////////