लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : जनतेने निवडून द्यावे आणि त्यांचेच पाय चाटावे काय? आमदार खासदार करतात तरी काय? शेतकरी या शासनाने निराधार केला आहे. यापुढे आया-बहिणीचे धिंडवडे काढणाऱ्या पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. विदर्भातील शेतकऱ्यांना न्यायाकरिता २० आॅक्टोबरपासून करा किंवा लढा आंदोलन सुरू करू, अशी घोषणा राजूराबाजार येथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी केले.राजूराबाजार येथे संत्रा, तूर, कापूस दुष्काळ परिषदेत शुक्रवारी पार पडली. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. विदर्भात पाऊस पडला नाही. हातची पिके गेली. संत्रा नाही; कापूस, तूर, सोयाबीन पिकणार नाही. यामुळ ेशासनाने आतातरी दुष्काळ जाहीर करावा, असे यावेळी खा. शेट्टी म्हणाले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या मुलांनी सभागृहात नेतृत्व करण्याकरिता लढा आंदोलन करावे. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे शेलारमामा म्हणून उभा आहे, असेही खा. शेट्टी यांनी सांगितले.संत्रा, तूर कापूस दुष्काळ परिषदेला प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजी केंद्रीय मंत्री शेतकरी नेते सुबोध मोहिते, विदर्भाध्यक्ष देवेंद्र भुयार, वाशिमचे दामुअण्णा इंगोले, कार्याध्यक्ष बंगाळ ेपाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण मोहोड, तालुकाध्यक्ष संदीप खडसे, प्रदिप कांबळे, रमेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रविकांत तुपकर यांनी आ. बोंडे यांना थेट आव्हान दिले. सुबोध मोहिते यांनीही परिषदेला मार्गदर्शन केले.परिषदेचे आयोजन तालुकाध्यक्ष संदीप खडसे, ऋषीकेश राऊत, सुमीत गुर्जर, नीलेश कोहळे, उमेश डबरासे, राहुल श्रीराव, मंगेश तट्टे, किशोर घाटोळे, किशोर चंबोळे, ओंकार बहुरूपी आदींनी केले होते. यावेळी प्रचंड गर्दी होती.
घराची अब्रू घालवणाऱ्या सरकारला पायदळी तुडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 11:06 PM
जनतेने निवडून द्यावे आणि त्यांचेच पाय चाटावे काय? आमदार खासदार करतात तरी काय? शेतकरी या शासनाने निराधार केला आहे. यापुढे आया-बहिणीचे धिंडवडे काढणाऱ्या पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही.
ठळक मुद्देराजू शेट्टी राजुराबाजारात गरजले : संत्र्याला ५० हजार, सोयाबीनला ३० हजार अनुदान द्या