फोटो -
बडनेरा : उड्डाणपुलाच्या चढावर ब्रेक फेल झाल्याने मागे येत ट्रक रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळला. सुदैवाने मागील बाजूस वाहने नसल्याने अनुचित प्रकार टळला. ही शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली.
बडनेराच्या रेल्वे माल धक्क्यावरून धान्य अमरावती शहरातील गोदामात रिते करून पुन्हा फेरी करण्यासाठी परतणाऱ्या एमएच २७ सीक्यू ५७१० क्रमांकाच्या ट्रकचे ब्रेक गांधी विद्यालयासमोरील उड्डाणपुलावर फेल झाले. त्यामुळे ट्रक मागे येत होता. चालक अरुण मेश्राम याने दुर्घटना घडू नये, यासाठी समयसूचकतेने अटकाव करण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या कडेला तो ट्रक घेतला. मात्र, उड्डाणपुलाचे कठडे तोडून हा ट्रक ३० फूट खोल खड्ड्यात जाऊन कोसळला. त्यालगत रेल्वे कर्मचाऱ्यांचे क्वार्टर आहेत. सुदैवाने ट्रक रिव्हर्स येत असताना मागे वाहने नव्हती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. अपघातानंतर उड्डाणपुलावर एकच गर्दी जमली होती. ट्रकचालकाला कुठलाही मार लागलेला नाही.
बॉक्स:
नादुरुस्त ट्रक रस्त्यावर
शहरात मोठ्या प्रमाणात नादुरुस्त ट्रक रस्त्यावर धावतात. अनेक ट्रकचे मागील बाजूस असणारी झडप अर्धवट लागलेली असते. फुटेपर्यंत टायर वापरले जातात. वाहनांच्या फिटनेसबाबत संबंधित प्रशासनाने अलर्ट असणे गरजेचे आहे.