सहा महिन्यांतील आठवा अपघात, अपघाताचे प्रमाण वाढलेरिद्धपूर : छिंदवाडा येथून आलेला ट्रक पहाटे ५ वाजता स्थानिक बस स्थानकापुढील डिव्हायडरवर चढला. अपघातात ट्रकचे चेसीस तुटल्याने सर्व दहा चाके निखळली व केबिनसह धूड उलटले.
प्राप्त माहितीनुसार, एमपी २२-०५६१ क्रमांकाचा दहा चाकांचा ट्रक
कापडाच्या साबणाच्या पेट्या अंजनगाव सुर्जी घेऊन येत होता. रिद्धपूर येथील बस स्थानक परिसरातील डिव्हायडरच्या प्रारंभी सिग्नल खांब नसल्याने तसेच पथदिवेही बंद असल्याने हा भरधाव ट्रक चालकाने थेट डिव्हायडरवर चढविला. यामुळे ट्रकचे चेचीसतुटले व सर्व दहा चाके वेगळी होऊन रस्त्यावर पडली ट्रकचे धूड रस्त्यावर उलटल्याने नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व
काच फोडून चालक व वाहक यांना केबिनमधून सुखरूप बाहेर काढले. यापरतवाडा ते पांढुर्णा राज्य महामागाचे बांधकाम एचजी इन्फ्रा या कंपनीकडून करण्यात आले. रिद्धपूर येथून गेलेल्या रस्त्याचे रुंदीकरण केलेले नाही, उलट त्यावरच डिव्हायडर व रस्त्यालगत पथदिवे लावण्यात आले आहेत. गतिरोधक नसल्याने बस स्थानक परिसरात सहा महिन्यांत
आठ अपघात झाले. रस्ता रुंदीकरण, पथदिवे व जिल्हा परिषद पूर्वमाध्यमिक शाळेपुढे गतिरोधकाची मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, ग्रामपंचायत सदस्य सचिन डवके, प्रवीण जावरकर, मंगेश शेळके, महंत राजेन्द्रदादा वाइन्देशकर यांनी प्रशासन व कंत्राटदार कंपनीकडे अनेकदा केली. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही.
------------
अपघातानंतर आली जाग
अपघातानंतर सकाळी ८ वाजता कंत्राटदार कंपनीकडून शाळेपुढील रस्त्यावर गतिरोधक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले.