शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

परतवाड्यात ट्रकने सायकलस्वारास चिरडले

By admin | Published: April 10, 2016 12:14 AM

सायकलने गवंडी कामावर जाण्यास निघालेल्या मजुराला भरधाव ट्रकने चिरडले. शहरातील जयस्तंभ चौकात शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली.

चालक पसार : जयस्तंभ चौकानजीकची घटनापरतवाडा : सायकलने गवंडी कामावर जाण्यास निघालेल्या मजुराला भरधाव ट्रकने चिरडले. शहरातील जयस्तंभ चौकात शनिवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. मो. राजीक शे. मेहबूब (२५, रा. मंजूरपुरा, अचलपूर) असे मृताचे नाव आहे. मो. राजीक सायकलने गवंडी कामासाठी निघाला होता. घरून निघाल्यावर जयस्तंभ चौकात येताच एमएच ३० एल ०८२९ या ट्रकने मो. राजीकच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात राजीकचा जागीच मृत्यू झाला. परतवाडा पोलिसांनी मो. साबीर मो. हबीब यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला. अपघातानंतर अकोला, इंदूर, धारणी, बैतूलकडे जाणारी वाहतूक काही वेळासाठी बंद झाली होती. नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता. शहरातील रस्ते चौपदरीकरण झाल्याने अमरावती-अचलपूर शहराकडे जाणारा मार्ग मोठा व परतवाडा शहरात व इंदूर, अकोला, चिखलदरा, धारणीकडे जाणारा मार्ग अरुंद झाला आहे. मधात मोठी जागा सुटल्याने पादचाऱ्यांसह सायकल, दुचाकीस्वारांची गोची होते. रस्ता चौपदरीकरणानंतर जयस्तंभ ‘शिवणी पार्क’ हटविण्याच्या हालचालीला आधी विरोध झाला होता, हे विशेष.