परतवाडा : परतवाडा ते धारणी मार्गावरील बिहाली ते घटांग मार्गावर मालवाहू ट्रक अपघाताच्या घटना आता वाढू लागल्या आहेत. शनिवारी सायंकाळी मध्यप्रदेशातून पुस्तक घेऊन येणारा ट्रक रस्त्याच्या कडेला कोसळून अपघात झाला.
अमरावती-इंदूर हा आंतरराज्य महामार्ग असून, परतवाडा ते धारणी दरम्यान चिखलदरा तालुक्यातील बिहाली चिखली फाट्यापर्यंत मोठा घाट वळणाचा रस्ता आहे. उंच पहाडातून हा मार्ग काढण्यात आला आहे. याच मार्गावर रात्रंदिवस मालवाहू आणि प्रवासी वाहतूक होत आहे. या मार्गावर आता आठवड्यातून दोन ते तीन ट्रक अपघाताच्या घटना घडू लागल्याने अपघातग्रस्त मार्ग झाला आहे. सुदैवाने यात कुठल्याच प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु ट्रकला अपघात होऊन त्यातील साहित्याची मोडतोड होण्यासह वाहनांचे नुकसान होत आहे.
बॉक्स
घटांग ते बिहाली दरम्यान अपघात वाढले
घटांग ते बिहाली दरम्यान असलेल्या घाटवळणातून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पाच दिवसांपूर्वीच पिकनिक पॉईंटजवळ मध्यप्रदेशातून गहू घेऊन येणारा ट्रक ५० फूट खोल दरीत कोसळला. शनिवारी सायंकाळी पुन्हा पृष्ठ घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या कडेला वळणावर कोसळला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि व्याघ्र प्रकल्पाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.