शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

सामदा कासमपूर येथे धावता ट्रक पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 11:06 PM

तालुक्यातील सामदा कासमपूर येथे दुपारी १ च्या सुमारास धावत्या ट्रकला आग लागली. आगीमुळे ट्रकमधील कापसाने पेट घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, अज्ञात युवकांच्या दगडफेकीत जिनिंगचे व्यवस्थापक जखमी झाल्याचेही या घटनेत पुढे आले आहे.

ठळक मुद्देलाखोंचा कापूस खाक : जिनिंगच्या व्यवस्थापकावर युवकांनी भिरकावले दगड

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुक्यातील सामदा कासमपूर येथे दुपारी १ च्या सुमारास धावत्या ट्रकला आग लागली. आगीमुळे ट्रकमधील कापसाने पेट घेतल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, अज्ञात युवकांच्या दगडफेकीत जिनिंगचे व्यवस्थापक जखमी झाल्याचेही या घटनेत पुढे आले आहे.एमएच २८ एबी ६७३१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये जैनपूर येथील जयकुमार गोविंद अढाऊ यांचा ७० क्विंटल आणि शुभम संतोष अढाऊ यांचा २० क्विंटल कापूस खरेदी करून दर्यापूर येथील सद्गुरू जिनिंगकडे व्यवस्थापकासह मंडळी निघाली होती. वाटेत सामदा कासमपूरच्या १०० मीटर अलीकडे कापसाने पेट घेतल्याचे ग्रामस्थांना दिसले. त्यांनी चालकाला थांबण्याचा इशारा केला आणि लागोलाग अग्निशमन पथकाला कळविण्यात आले. यादरम्यान ट्रक पेटत असतानाच रस्त्याच्या कडेला असलेल्या घराजवळील कुटारानेही पेट घेतला. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती.अग्निशमनपुढे पेचट्रक विझविण्यासाठी आलेल्या दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशमन वाहनाला प्रथमत: नागरिकांच्या गर्दीमुळे अलीकडे अडकावे लागले. त्यातच ग्रामस्थांनी आधी कुटाराला लागलेली आग विझविण्याचा धोशा लावल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला; तथापि पेटत्या ट्रकच्या आगीचा धोका लक्षात घेऊन अग्निशमनच्या दोन बंबांनी प्रथम ही आग विझविली. येवदाचे ठाणेदार नितीन चरडे यांनी पंचनामा केला.अज्ञातांची दगडफेकट्रकमुळे कुटाराला लागलेली आग गावात इतरत्र पसरू शकते, असा रोष व्यक्त करीत काही तरुणांनी ट्रकचालकाच्या केबिनकडे दगड भिरकावले. दगडफेकीत जिनिंगचे व्यवस्थापक प्रमोद मुळे व काही कर्मचारी जखमी झाले आहे. पोलीस पथक दाखल होताच हे अज्ञात युवक घटनास्थळाहून पळाले.आगीच्या घटनेला वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार कारणीभूत आहे. अनेक गावांमध्ये जिवंत विद्युत तारा लोंबकळत असतात. मुख्य रस्त्यावरही हीच परिस्थिती असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे.- सुधाकर भारसाकळे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष, दर्यापूरएकीकडे ट्रकमधील कापूस पेटत होता, दुसरीकडे गवत पेटून आग झपाट्याने गावाकडे पसरत होती. दगड मारल्याप्रकरणी पुढील चौकशी करून कारवाई करण्यात येईल.- नितीन चरडे,ठाणेदार, येवदा पोलीस स्टेशन