अमरावती : तुरीचे तीन हजार रुपयांचे कट्टे चोरताना एक जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळून आला. तसेच आरोपीने ते कट्टे दुसऱ्याला विकल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध भादंविचे कलम ३७९,४११ अन्वये गुन्हा नोंदविला. ही घटना कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते रणजित भुपेंद्र तिडके यांच्या दुकानाच्या शेडमध्ये घडली.
नीलेश मनोहर हांडे (रा. शोभानगर), रवि पुंडलिक बंगाले (रा. बडनेरा) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी ईश्वर मनोहर हांडे (२४, रा. राजुरा ता. चांदूर रेल्वे) यांनी तक्रार नोंदविली.
पोलीस सूत्रानुसार, फिर्यादी यांनी ७२ कट्टे चणा, २२ कट्टे तूर बाजार समितीतील अडते रणजित तिडके यांच्या अडतमध्ये विक्रीकरिता ठेवले होते. त्यानंतर ते धान्यमाल बघण्यास गेले असता, त्यांना एक कट्टा चणा गायब झाल्याचे निदर्शनास आले. त्यानी सीसीटिव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता, दोन इसम चोरी करताना दिसून आले. विचारणा केली असता, सदर धान्य बांगले यांना विकल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.