लोकमत न्यूज नेटवर्कगुरूकुंज मोझरी : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित आंतर महाविद्यालयीन देशभक्ती तथा लोकगीत समूहगान स्पर्धेचे प्रथम बक्षीस अमरावती येथील महिला महाविद्यालयाने पटकाविले. विद्यार्थिनींनी राष्ट्रसंतांचे ‘सच काम किया जगमे जिसने, उसने प्रभू नाम लिया ना लिया’ हे भजन उत्कृष्ट पद्धतीने सादर केले. या भजनातून राष्ट्रसंतांचा मानवतेचा संदेश थेट पोहोचत असल्याचे निर्णायक मंडळीने सांगितले.अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळ व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेयोच्या संयुक्त विद्यमाने २५ हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. २० हजार रुपये द्वितीय पारितोषिक अमरावतीच्या महात्मा फुले महाविद्यालयास, तर १५ हजार रुपये तृतीय पारितोषिक गुरूकुंज मोझरी येथील श्रीगुरूदेव आयुर्वेदिक महाविद्यालयाला प्राप्त झाले. उत्कृष्ट संगीत नियोजनाचे ५ हजार रुपये तिवसाच्या यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय व अमरावती येथील श्री शिवाजी महाविद्यालयाला देण्यात आले.आज विविध कार्यक्रम८ आॅक्टोबरला पहाटे ५.३० वाजता निर्मला पारधे समुदायिक ध्यानाच्या महत्त्वावर चिंतन करतील. सकाळी ७ वा. योगासन व प्राणायाम, ग्रामगीता प्रवचनाचे चतुर्थ पुष्प गोवर्धन खवले गुंंफतील. सायंकाळच्या सत्रात पुष्पा बोंडे सामुदायिक प्राथनेच्या महत्त्वावर चिंतन प्रस्तुत करतील. चिखलदरा श्रीगुरूदेव आदिवासी भजन मंडळाचा खंजेरी भजन कार्यक्रम रात्री ७.१५ वाजता. मनोज मिरकुटे यांचा ‘स्त्री भ्रूणहत्या व सर्वधर्म समभाव’ हा नाट्यछटा प्रयोग रात्री ८.१५ वाजता विलास साबळे यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाने समारोप होणार आहे.
‘सच काम किया जग मे जिसने’ ठरले सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 12:11 AM
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या ४९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित आंतर महाविद्यालयीन देशभक्ती तथा लोकगीत समूहगान स्पर्धेचे प्रथम बक्षीस अमरावती येथील महिला महाविद्यालयाने पटकाविले.
ठळक मुद्देपुण्यतिथी महोत्सव : समूहगान स्पर्धेत महिला महाविद्यालय अव्वल