मध्यप्रदेशातील दोघांना अटक : ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हातात देशी कट्टा घेऊन शहरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मध्यप्रदेशातील ग्वालियर येथील दोन आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. हा प्रकार कोतवाली पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने दोघांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मनोज अशोक बिलवार (२२) आणि मोईन खान इकबाल खान मन्सुरी (२३, दोन्ही रा.ग्वालियर, रा.मध्यप्रदेश) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, उपरोक्त दोन्ही तरूण रोजगाराच्या शोधात अमरावतीत आले होते. मागील काही दिवसांपासून दोघेही सरोज चौकानजीकच्या विशाल पंजानी यांच्या ‘बुट हाऊस’मध्ये काम करीत होते तर साबनपुरा परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. या दोघांनीही बुट हाऊसमध्ये चोरी करून १ लाख २० हजारांची रोख लंपास केली होती. यापैशातून त्यांनी एका व्यक्तीकडून देशी कट्टा खरेदी करून एम.एच.२४-बी.जे.-०५७४ क्रमांकाची दुचाकी विकत घेतली होती. मंगळवारी रात्री दोघेही वालकट कंपाऊंड परिसरात दुचाकीने फिरत होते. त्यांच्या हातात देशी कट्टा दिसून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले व खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात डीबी स्कॉडचे पोलीस शिपाई अब्दुल कलाम, गजानन ढेवले, प्रफुल्ल खोब्रागडे, सागर ठाकरे आणि विनोद भगत यांच्या पथकाने वॉलकट कम्पाऊंड परिसरात जाऊन दोन्ही युवकांची चौकशी केली असता त्यांनी बुट हाऊसमधील चोरीची कबुली दिली. पोलिसांनी दोघांचीही झडती घेऊन त्यांच्याजवळून देशी कट्टा जप्त केला. आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यतादेशी कट्ट्याचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या दोन्ही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चौकशीतून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. जुगार अड्ड्यावर धाड, मुद्देमाल जप्तअमरावती : फे्रजरपुरा पोलिसांनी यशोदा नगरातील वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून आरोपीजवळील साहित्य जप्त केला. याप्रकरणात पोलिसांनी दिपक किसन गायकवाड (३९,रा. मसानगंज)याचेविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
देशी कट्ट्याच्या धाकावर दहशत पसरविण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 29, 2017 12:28 AM