शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

‘मेरी जान तुझे कुछ नही होगा..,’ म्हणत इन्स्टावर ‘पोस्ट’!, एकतर्फी प्रेमातून धमकी

By प्रदीप भाकरे | Published: March 26, 2023 2:28 PM

अल्पवयीन मुलीने गाठले पोलीस ठाणे

अमरावती: ‘मेरी जान तुझे कुछ नही होगा, क्योंकी इसमे तेरी गलती कुछ भी नही, मुझे माफ करा दो, यह आपके और मेरे फोटो और मॅसेज है, कुठल्याही परिस्थितीमध्ये मला न सोडणारी बायको, सगळ्या जास्त काळजी करणारी. माझ्याकडून सगळे विचार करणारी, आय लव यू’ अशी इन्स्टा स्टोरी टाकत एका अल्पवयीन मुुलीला आत्महत्येची धमकी देण्यात आली. आरोपीच्या त्या वागण्याने हतप्रभ झालेल्या त्या मुलीने अखेर ठाणे गाठून पोलिसांची मदत मागितली.

याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी २४ मार्च रोजी रात्री आरोपी प्रतिक खंडारे (रा. महेंद्र कॉलनी) याच्याविरूध्द विनयभंग, बदनामी, धमकी व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, सन २०२० मध्ये आरोपी व फिर्यादी मुलीची ओळख होऊन त्यांच्यात मैत्री झाली. दोघांनी सोबत काही छायाचित्रे देखील काढली. काही दिवसांनी आरोपी प्रतिकने तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असे म्हणून प्रपोझ केले. मात्र वय व अन्य गोष्टी पाहता तिने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने न एैकल्याने तिने बोलणे बंद केले. त्यामुळे प्रतिकने ट्युशन ते घर असा तिचा पाठलाग सुरू केला. तो तिला अडवू देखील लागला. ही बाब तिने कुटुंबांला सांगितले असता, काही दिवस त्याने तिला त्रास दिला नाही.रस्त्यात अडवून धमकीदरम्यान, २२ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास ती अल्पवयीन मुलगी सुंदरलाल चौकातून टयुशन संपवून घरी जात असताना प्रतिकने तिची छेड काढली. माझ्याशिवाय अन्य कुणाशी बोलायचे नाही. तू जर माझ्याशी बोलली नाही, तर स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करेन, परंतु त्यापुर्वी तुला सुद्धा मारुन टाकेल, अशी धमकी दिली. त्यामुळे ती प्रचंड घाबरली.आत्महत्या करीत असल्याचे व्हिडीओ२४ मार्च रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास प्रतिक खंडारे याने मुलीच्या मोबाईलवर व्हाइस मॅसेज व काही व्हिडीओ टाकून आत्महत्या करत असल्याची बतावणी केली. त्याचवेळी प्रतिकने मुलीसोबतच फोटो इन्स्टाग्रामवर टाकून एक स्टोरी शेअर केल्याची माहिती मुलीला तिच्या मावसभावाने दिली. ती बदनामीकारक पोस्ट पाहताच त्या अल्पवयीन मुलीने शुक्रवारी उशिरा रात्री गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. तेथे महिला पोलिसांनी तिचे बयाण नोंदविले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी