अमरावती; महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर, तर दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर पासून सुरू होत आहे. बारावीसाठी विभागातील ८३० विद्यार्थी बसणार आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील ३२४ विद्यार्थी बसणार असून शिक्षण मंडळाने याकरिता विभागात ५१ परीक्षा केंद्र निश्चित केली आहेत. जिल्ह्यात १४ केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. याकरिता परीक्षक म्हणून १४ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळाच्यावतीने बारावीची पुरवणी इयत्ता बारावीची परीक्षा १६ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान ऑफलाईन पुरवणी परीक्षा होणार आहे. तर २२ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा केंद्रांना थर्मल गन, सॅनिटायझर, हँड वॉश आदी साहित्य पुरविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बारावीचे ३२४ विद्यार्थी १४ परीक्षा केंद्रावर पुरवणी परीक्षा देणार आहेत.