लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : शहरासाठी वीजवितरण व्यवस्था सोयीची व्हावी, यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात आले होते. शासकीय शिरस्त्यानुसार या कामाचे रीतसर ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी याच कामाचे आमदारांनीही भूमिपूजन केले. तरीही या ३३ के.व्ही. उपकेंद्राचे काम मार्गी लागलेले आहे.तालुक्यात २०१७ मध्ये दोन ३३ के.व्ही.ची विद्युत उपकेंद्र मंजूर झाले होते. यात चांदूरबाजार शहरासाठी एक व ब्राम्हणवाडा पाठक परिसरासाठी एक अशा दोन उपकेंद्रांचा समावेश होता. या दोन्ही उपकेंद्रांचे भूमिपूजन १९ आॅगस्ट २०१७ ला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर तब्बल शंभर दिवसांनी याच कामाचे भूमिपूजन आ. बच्चू कडू यांनी केले. अशाप्रकारे या दोन्ही उपकेंद्रांना दोनदा भूमिपूजनाचा मान मिळाला.आमदारांच्या भूमिपूजनानंतर या दोन्ही ठिकाणी कामाला सुरूवात झाली. ब्राम्हणवाडा पाठक येथील उपकेंद्राचे काम आज पूर्ण होण्याच्या स्थितीत आले आहे; मात्र भूमिपूजनाला एक वर्ष पूर्ण होऊनही चांदूरबाजारच्या उपकेंद्राचे काम ठप्प आहे. कंत्राटदाराने फक्त प्लिंथ बांधून काम अर्धवट ठेवले आहे. त्यामुळे चांदूरबाजार उपकेंद्राचे काम अर्धवट राहण्यास कोण जबाबदार, ऊर्जामंत्री की आमदार, असा सवाल नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी उपस्थित केला आहे.चांदूरबाजारला होणारे ३३ के.व्ही.चे उपकेंद्र शहराच्या वीज पुरवठ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. परंतु, त्याचे काम बंद पडले आहे. या उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. यासाठी मी १ आॅगस्टला ऊर्जामंत्र्यांना, मंत्रालयात जाऊन विनंती पत्र दिले. काम पुन्हा सुरू होण्याचे आदेश केव्हा धडकतात, याची प्रतीक्षा आहे.- गोपाल तिरमारे,नगरसेवक, चांदूरबाजार.३३ के.व्ही.चे उपकेंद्राचे बांधकाम मोर्शी उपविभागाच्या अखत्यारित येते. त्यामुळे त्यांच्याकडून काम बंद का पडले, याबाबत फारशी माहिती नाही. सध्या या बांधकाम स्थळावरील काम ठप्प पडले आहे. यासंदर्भात वरिष्ठांकडे चौकशी करून माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.- विपुल बन्नोरे,शहर अभियंता, महावितरण.
दोनदा भूमिपूजन, काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 9:39 PM
शहरासाठी वीजवितरण व्यवस्था सोयीची व्हावी, यासाठी ३३ के.व्ही. उपकेंद्र मंजूर करण्यात आले होते. शासकीय शिरस्त्यानुसार या कामाचे रीतसर ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी याच कामाचे आमदारांनीही भूमिपूजन केले. तरीही या ३३ के.व्ही. उपकेंद्राचे काम मार्गी लागलेले आहे.
ठळक मुद्दे३३ केव्ही उपकेंद्र अधांतरी : जबाबदारी ऊर्जामंत्र्यांची की आमदारांची? नागरिकांचा सवाल