अचलपूर पोलिसांची कारवाई : ११ लाखांचा गुटखा जप्तलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर पोलिसांनी टाकलेल्या दोन वेगवेगळ्या धाडीत ११ लाख ३५ हजार रुपयांचा गुटखा घरातून जप्त करीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. साजीद खाँ महमुद खाँ (४०, रा.ठिकरीपुरा) व मुक्तार खाँ सत्तार खाँ (५५, रा. चावलमंडी अचलपूर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ठाणेदार आधारसिंग सोनोने, पीएसआय ब्राम्हण, सुनील खारोडे, संजय ठाकरे, विनोद राऊत, रवि बावने, सचिन भोंबे आदींच्या पथकाने साजीद खाँ महम्मद खाँ यांच्या घराची झडती घेतली असता ११ लाख २० हजार रुपयांचा गुटखा पोते आढळून आले. सोमवारी सकाळी १० वाजता चावलमंडी येथील मुख्तार खाँ सत्तार खाँ यांच्या जवळून पंधरा हजाराचा अवैध गुटखा पकडण्यात आला. पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा अवैध गुटखाविरुद्ध कारवाई केल्याने जुळ्या शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचे गोदाम असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात गुटखा बंदी असताना लाखो रुपयांचा गुटखा घरामध्ये गुटखा तस्करांनी डांबून ठेवल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.परतवाड्यात दीड लाखांचा गुटखा जप्त ४परतवाडा पोलिसांनी येथील सैलानी प्लॉट येथे वसीम अली रहमत अली यांच्या घरावर सोमवारी सकाळी ११ वाजता धाड टाकून जवळपास दीड लक्ष रुपयांचा गुटखा जप्त केला. जुळ्या शहरात खुलेआम गुटखा विक्री पानटपरी किराणा दुकानातुन केल्या जात आहे तर नजीकच्या मध्यप्रदेशातून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखातस्कर राज्यात बंदी असताना लाखो रुपयांचा साठा करून ठेवत असल्याचे उघड झाले आहे अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत मीना, ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय फरकाळे, शिवा आठवले, मनोज पंडित, अशोक दहीकर, अमोल वाढोणकर, आशिष भुंटे आदींच्या पथकाने सदर कारवाई केली.गोपनीय माहितीच्या आधारे दोन ठिकाणी धाड टाकून जवळपास ११ लक्ष रुपयांपेक्षा अधिकचा गुटखा पकडण्यात आला आहे. अन्न व औषध विभागाला पुढील कारवाईसाठी माहिती दिली आहे.- आधारसिंग सोनोने, ठाणेदार, अचलपूर
दोन घरांवर धाड दोन आरोपींना अटक
By admin | Published: May 30, 2017 12:17 AM