वरुड : तालुक्यात देऊतवाडा येथे ग्रस्तीवर गेलेल्या महसूल पथकावर रेती तस्करांनी प्राणघातक हल्ला प्रकरणातील दोन आरोपीला अटक करण्यात वरुड पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपी अद्यापही फरारच आहे . या प्रकरणात पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून उर्वरित आरोपीचा वरुड पोलीस शोध घेत असून पथके तैनात करण्यात आली .
पोलीस सूत्रानुसार आरोपीचे नाव शिवा शिवहरे , योगेश गुल्हाने , सुरेंद्र भुयार , सचिन थोटे , आशिष शेळके , महेंद्र चौधरी सर्व रा . राजूराबाजार असे असून ६ आरोपी अज्ञात असून असे १२ आरोपीविरुद्ध विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते . यातील सर्व आरोपी पसार झाले होते . महसूल कर्मचाऱयांचे भरारी पथक गत बुधवारच्या पहाटे साडेतीन वाजता ग्रस्तीवर असताना देऊतवाडा रेती घाटावर रेती तस्करांनी महसूल हल्ला करून गंभीर जखमी केले तर या पथकाच्या दुचाकी वाहनांची तोडफोड केली होती . आरोपींनि घटनास्थळावरून पोबारा केल्याचे सांगण्यात आले होते . पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला मात्र घटनेच्या तिसऱ्यादिवशी यातील दोन आरोपीना [आकडण्यात पोलिसांना यश आले . या याप्रकरणातील अटक केलेले आरोपी महेंद्र चौधरी आणि सचिन थोटे असे आहे . तर उर्वरित आरोपीचा शोध सुरु आहे . या प्रकरणात पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून उर्वरित आरोपीचा वरुड पोलीस शोध घेत असून पथके तैनात करण्यात आली .
देऊतवाडा रेती घाटावरील शेकडो ट्रॅक्टर रेतीचे ढिगारे केले जप्त
रेती तस्करांनी देऊतवाडा रेती घाटापासून काही अंतरावर रेतीची साठवणूक करून ढिगारे लावले होते . यातून रात्रीच्या वेळी तस्करी सुरु होती . महसूल आणि पोलीस विभागाने सदर साठवणूक केलेली रेती जप्त करून कारवाही केली . सदर रेतीचा लिलाव करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते .
शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडतोय ! परंतु पर्वा कुणाला !
तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीला उधाण आले आहे . यामुळे रेती तस्करांचे चांगले फावत असून शासनाचा कोरयावधी रुपयांचा महसूल बुडत असून याची पर्वा कुणाला असा सवाल सर्वसामान्य नागरीकातून केल्या जात आहे . अनेक वेळा लिलाव केले परंतु महागाईमुळे कुणी पुढे येत नाही असे महसूल विभागाकडून सांगितल्या जाते . परंतु महसूल बुडत असल्याची पर्वा आहे तरी कुणाला ? असा सवाल सर्वसामान्य नागरीकातून विचारल्या जात आहे .