शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

मेळघाटातील बांधकाम विभागाचे अडीच कोटी परत

By admin | Published: March 03, 2016 12:22 AM

एकीकडे विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची ओरड जिल्हा परिषदेत सुरू असताना जि.प.च्या बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील मेळघाटातील ...

कामचुकारपणा : बांधकाम समितीद्वारा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस अमरावती : एकीकडे विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याची ओरड जिल्हा परिषदेत सुरू असताना जि.प.च्या बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील मेळघाटातील धारणी येथील बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्याच्या कामचुकारपणामुळे सन २०१३-१४ मधील सुमारे २ कोटी ४२ लाख रूपयांचा निधी शासन गेला आहे. या विषयावर बुधवारी जिल्हा परिषद बांधकाम विषय समितीत वादळी चर्चा झाली. या गंभीर प्रकारासाठी जबाबदार उपविभागीय अभियंता ए.बी.भुताड यांच्यावर कारवाई करण्याचे समितीने प्रस्तावित केले आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाला शासनाकडून दरवर्षी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र, या निधीतून केल्या जाणाऱ्या ८ पीएचमधील कामांचे सुमारे २ कोटी तर रस्ते विकासाचे सुमारे ४२ लाख रूपये सन २०१३-१४ मध्ये मेळघाटातील विकासकामांसाठी मंजूर करण्यात आले होते. मात्र, हा निधी खर्च करण्यासाठी बांधकाम उपविभागाने कोणत्याच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे हा निधी शासनाकडे परत गेला आहे. यासोबतच मेळघाटसाठी सन २०१३-१४ मध्ये ३ कोटी, २०१४-१५ मध्ये ४ कोटी, आणि सन २०१५-१६ करिता सुमारे ११ कोटी असा एकूण १७ कोटींचा विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, या निधीमधून प्रस्तावित विकास कामांचे अंदाजपत्रक अद्यापही धारणी बांधकाम विभागाचे उपअभियंता भुताड यांनी सादर केले नाही. त्यामुळे हीसर्व कामे रखडली आहेत. आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ आता काही दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे १७ कोटी रूपयांचा निधी मार्च अखेरपर्यत कसा खर्च ृहोईल, असा प्रश्न बांधकाम समिती समेत अन्य सदस्यांनी उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मेळघाटातील विकासाची कामे जाणिवपूर्वक रोखली जात असल्याचा आरोप श्रीपाल पाल यांनी केला आहे. या गंभीर प्रकाराची बांधकाम सभापती गिरीश कराळे यांनी दखल घेतली असून विकासकामात कुचराई करणाऱ्या संबंधित उपविभागीय अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ यांना दिले आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून या प्रकारांना आळा घालण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात होणाऱ्या कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.दप्तर दिरंगाईचा प्रकारअमरावती : यासंदर्भात गुरूवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात त्वरीत माहिती सादर करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या आहेत. दुर्गम मेळघाटच्या विकासकामात अशा प्रकारची दप्तर दिरंगाई करणे, ही बाब अतिशय गंभीर असून या प्रकाराला त्वरीत आळा घालण्याची मागणी बांधकाम समिती सदस्यांनी केली आहे. याशिवाय सभेत ३०-५४ या लेखाशिर्षाखाली बांधकाम विभागाला प्राप्त निधीतील सुमारे १७ कोटी रूपये पूर्णत: खर्च करण्यात आले आहेत. तर तीर्थक्षेत्र विकासाचा अखर्चित निधी हा मार्च अखेरपूर्वी खर्च करण्याच्या दृष्टीने बांधकाम सभापतींनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सभेला सभापती गिरीश कराळे, सदस्य मोहन सिंघवी, प्रवीण घुईखेडकर, विनोद डांगे, श्रीपाल पाल, निशांत जाधव, ममता भांबुरकर, प्रेमा खलोकार, कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ, उपविभागीय अभियंता ए.बी. पाटील, राजेश रायबोले व बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)