अमरावती : गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दुचाकीचोरांना अटक करून, त्यांच्याजवळील ८० हजारांच्या दोन दुचाकी जप्त केल्या.
निखिल नरेंद्र शेंडे (२१ रा. महेंद्र कॉलनी) आणि अक्षय लालबहादूर ठाकूर (२१ रा. लक्ष्मीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस पेट्रोलिंग दरम्यान दोन इसम चोरीच्या दुचाकी घेऊन पंचवटी चौकातून गाडगेनगरकडे येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. परंतु ते दुचाकीचे दस्तावेज पोलिसांकडे सादर करू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
सदर चोरट्यांनी गाडगेनगर, फ्रेजरपुरा हद्दीतून दुचाकी चोरल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आरोपींनी एमएच २७ एक्यू १७२२ या क्रमांकाची दुचाकी गाडगेनगर हद्दीतून चोरल्याचे आढळून आले, एमएच २७ सीएच ३९५३ या क्रमांकाची दुचाकी फ्रेजरपुरा हद्दीतून चोरल्याचे आढळून आले. गुन्हे शाखेने चौकशीनंतर आरोपींसह दोन्ही दुचाकी संबंधित पोलीस ठाण्याला पुढील कारवाईसाठी सोपविले. पुढील तपास गाडगेनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले करीत आहेत.