लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीवरून परतवाडाकडे येणाऱ्या भरधाव कारने बोरगावपेठ नजीक रस्ता ओलांडून जात असलेल्या तीन वर्षीय दोन रोहींना मंगळवारी सकाळी १०.३० वाजता जोरदार धडक दिली. यात दोन्ही रोही जागेवरच ठार झाल, तर कारचा पुढील भाग चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात चालक जखमी झाल्याची माहिती आहे.चालक सतीश बहादुरे (रा. साईनगर) हा किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. तो अचलपूर येथे महावितरणमध्ये कार्यरत सुनीता शंकर इंगळदार, वनिता दीपक हिंगमिरे, संकेत देविदास यादव (सर्व रा. अमरावती) यांना घेऊन परतवाडा येत असताना हा अपघात झाला. एमएच २७ बीव्ही ९३१५ क्रमांकाच्या कारने अमरावतीवरून हे महावितरणचे कर्मचारी कार्यालयात हजर राहण्यासाठी निघाले होते. चालक सतीश बहादुरे (रा. साईनगर, अमरावती) याची भरधाव कार रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या रोहींना धडकली. त्यात रोही घटनास्थळीच ठार झाले, तर कारचे बोनेट चेंदामेंदा झाले होते.दरम्यान, अपघातप्रकरणी आसेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. रोहीच्या शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांनी सांगितले.पोलीस आणि वनाधिकाऱ्यांनी केला पंचनामासदर घटनेचा पंचनामा आसेगाव पोलीस व परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे, वनपाल बाबाराव झांबरे, वनरक्षक एस.व्ही. भोंडे यांनी केला. नर-मादीची ही जोडी तीन वर्षांची होती. परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी असल्याने अपघातात वन्यप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे