आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील गाडगेनगर व राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी चेनस्नॅचिंगच्या दोन घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती. या दोन्ही घटनांमध्ये चेनस्नॅचरने दोन वृद्ध महिलांना लक्ष्य केले. या गुन्ह्यात ६० हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले आहेत.करडेनगरातील रहिवासी रजनी विष्णू केळकर (७०) परिसरातीलच महादेव मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. घरी परत जात असताना एका दुचाकीवर आलेल्या हेल्मेटधारक दोन अज्ञात तरुणांनी रंजनी केळकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविले. त्यांनी विरोध केला तोपर्यंत चोरट्यांनी १५ गॅॅ्रमचे सोन्याचे मणी पळविले. १०.३५ वाजता भटकर नामक इसमाने गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी तत्काळ सूत्रे हलवित चौकशी सुरू केली. दोन तासांच्या अंतरावर राजापेठ हद्दीतील दस्तुरनगर चौकानजीक दुसरी घटना घडली. गोंडबाबा मंदिराच्या मार्गावर राजकुमारी बन्सीलाल लुल्लानी (६५, रा. प्रीत रेसिडन्सी) ही महिला दुपारी १२.३० वाजता हातगाडीवर भाजी खरेदी करीत होती. एका दुचाकीवर रुमाल बांधलेल्या दोघांनी पत्ता विचारून गळ्यातील आठ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकाविले. ठाणेदार किशोर सुर्यवंशी घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली होती. दोन्ही ठिकाणी मंगळसूत्र तुटले होते.आरोपी सीसीटीव्हीत कैदगाडगेनगर हद्दीत झालेल्या चेनस्नॅचिंगच्या घटनेच्या तपासात पोलिसांनी अधिवक्ता तिवारी यांच्या घरासमोरील सीसीटीव्हींची तपासणी केली. त्यामध्ये दोन तरुण दुचाकीवरून जात असल्याचे आढळून येते. या वर्णनावरून पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.दोन संशयितांचा पाठलागशहरात दोन चेनस्नॅचिंगच्या घटनांची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पोलिसांनी नाकाबंदी व गस्त वाढवून चोरांची शोधमोहीम घेतली होती. दरम्यान, पोलिसांना पाहून दोन तरुण बडनेराच्या दिशेने एमएच २७ बीके-६५६७ क्रमांकाच्या दुचाकीने भरधाव जात असल्याचे दामिनी पथकाला आढळून आले. ही माहिती दामिनी पथकाने नियंत्रण कक्षाला कळवून दुचाकीचा पाठलाग केला. गुन्हे शाखेच्या पथकानेही पाठलाग सुरू केला. मार्गातील बडनेरा व लोणी पोलिसांना अलर्ट करण्यात आले. अखेर लोणी पोलिसांनी दुचाकीस्वारांना पकडले. तिलक रामसिंह खुशालसिंह मुणोद (रा. विजयपथनगर) व कल्पेश माणिकचंद जोशी (३८, रा. जुना सराफा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहे. लोणी पोलिसांनी त्यांना बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन केले.
भरदिवसा दोन चेनस्नॅचिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 10:42 PM
शहरातील गाडगेनगर व राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी चेनस्नॅचिंगच्या दोन घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती.
ठळक मुद्दे६० हजारांचे मंगळसूत्र लंपास : गाडगेनगर, राजापेठ हद्दीतील घटना