फोटो पी २२ सापन
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पाचे दोन दरवाजे गुरुवारी सकाळी ११ वाजता १० सेंटीमीटरने उघडण्यात आले. यातून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग पाहता नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सपन प्रकल्प ६७ टक्के, तर चंद्रभागा आणि शहानूर प्रकल्प ५५ टक्केच्या वर भरले आहेत.
या तीनही धरण क्षेत्रात सकाळपासून चांगला पाऊस पडत आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे जलाशयात वाढ होत आहे. साधारणत: धरणातील जलसाठा ६१ टक्केच्या वर गेल्यास धरणाची दारे उघडली जातात. धरणात येणारी पाण्याची आवक बघता शहानूर आणि चंद्रभागा प्रकल्पाचीही दारे उघडली जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कोट
सपन प्रकल्प ६७ टक्के भरला असून, प्रकल्पाचे दोन दरवाजे १० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे.
- सुबोध इंदूरकर, उपविभागीय अभियंता, सपन प्रकल्प
कोट
अचलपूर तालुक्यातील सपन धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठावरील सर्व गावांना मुनादी देऊन दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. व्यक्ती, जनावरे, वाहने अथवा कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात जाऊ नये. कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- मदन जाधव, तहसीलदार, अचलपूर