लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक मसानगंज परिसरात जुन्या टायरला लागलेल्या आगीने दुकानासह दोन घरांना कवेत घेतले. ही घटना गुरुवारी पहाटे ४.४० च्या सुमारास मनपा हिंदी स्कूल-२ नजीक घडली. अग्निशमन दलाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठी हानी टळली.पोलीस सूत्रांनुसार, रामकृष्ण फूलचंद्र अहेरवार यांच्या वाहनांच्या जुने टायर विक्रीचे दुकान आहे. त्याच्या बाजूलाच असलेल्या गोदामात जुने ५० ते ६० टायर ठेवण्यात आले होते. अचानक लागलेल्या आगीत टायर जळाले आणि पाहतापाहता बाजूच्या दुकानासह घरालाही आगीने कवेत घेतले. घरातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रामकृष्ण अहेरवार यांनी पोलीस व अग्निशामन दलाला माहिती देताच घटनास्थळी दाखल झालेले अग्निशमन दलाचे तीन बंब व १४ ते १५ फोमच्या कॅनच्या साहाय्याने दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दलाचे प्रमुख सैयद अन्वर, आकाश राऊत, गोपाल भोकरे, जुबेरभाई, फायरमन हर्षद दहातोंडे, सूरज लोणारे, किशोर शेंडे, सतीश घाटे, मोहसिन इकबाल , जाधव, अमोल सांळुखे, योगेल खर्चान, श्रेयश मेटे यांनी प्रयत्न केले. पोलीसदेखील यावेळी उपस्थित होते.
दुकानासह दोन घरांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 1:27 AM
स्थानिक मसानगंज परिसरात जुन्या टायरला लागलेल्या आगीने दुकानासह दोन घरांना कवेत घेतले. ही घटना गुरुवारी पहाटे ४.४० च्या सुमारास मनपा हिंदी स्कूल-२ नजीक घडली. अग्निशमन दलाचे तीन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने मोठी हानी टळली.
ठळक मुद्देघरातील साहित्य खाक : मसानगंज येथे पहाटे साडेचारची घटना