एकट्या अंजनगाव दहिगाव- रेंजमध्ये २५ सेंटरमधील रोप वनासह दोनशे एकर जंगल जळाले. या रेंज अंतर्गत टेंब्रुसोंडा वर्तुळातील वनखंड क्रमांक १०५५ मध्ये सन २०१९ मध्ये ए.एन.आर रोपवन घेतल्या गेलेल्या पाच हजार रोपे लावली गेली. या वृक्षलागवडीसह त्या ठिकाणी नैसर्गिक १५ हजार रोपे लावल्याचे नोंदले गेले. दरम्यान या वृक्षलागवडीवर पहिल्या टप्प्यापासूनच काहींनी आक्षेप नोंदविले. सन २०१९-२० मध्ये या रोपवनात पाच हजार रोपे लावली गेली नाही. केवळ अडीच ते तीन हजार रुपये लावली गेली. लावलेली रोपे आणली गेलेल्या कट्ट्यांवर लाखोंचा गैरव्यवहार केला गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नेमके २५ हेक्टर क्षेत्रातील रोपवन एकाच रात्रीतून जळून खाक झाले. त्यामुळे त्यावर दाखविला गेलेला लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ ठरला आहे. चेंब्रुसोंडा वर्तुळ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या पाच हजार रोपांपैकी तीन हजार रुपये या आगीत जळाली आहेत. या घटनेनंतर उपवनसंरक्षकांसह सहायक वनसंरक्षकांनी या रोपवनाची व वनखंडाची प्रत्यक्ष पाहणी केली.
वन गुंन्हे जारीनियत क्षेत्रांमध्ये लागलेल्या आगीत जंगल जळाले आहेत. जंगलाला लागलेल्या आगीच्या अनुषंगाने वनपाल आणि गुन्हे जारी केले आहेत. यामध्ये प्रत्यक्ष आगक्षेत्रापेक्षा अत्यंत कमी आग क्षेत्र दाखविण्यात आले आहे. या आधीच्या गुन्ह्यातील आरोपी अज्ञात आहेत आणि पुढे वन्यजीवास झालेली इजा जीवित हानी निरंक आहे. आगीमुळे जंगलात गवत व पालापाचोळा तेवढा जळाल्याचे दाखविण्यात आले आहे. हे या जळालेल्या गवत व पालापाचोळ्याचे मोजमाप बैलबंडी दाखवून झालेले नुकसान तीन ते पाचशे रुपये एवढेच दाखविले गेले. यात हे जारी केल्या जात असलेले वनगुन्हे आणि पंचनामेच आता संशयास्पद ठरत आहेत.
कोट
फायर अलर्टवरून आगीची माहिती मिळते. सॅटेलाइटच्या माध्यमातून हे फायर अलर्ट मिळतात. अंजनगाव वनपरिक्षेत्रात फायरचे सात ते आठ अलर्ट मिळाले असून त्या मोठ्या फायरचे अलर्ट नाहीत. अलर्टनुसार आगी लावल्या जातात. जळालेल्या रोपवनाला उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षकांनी भेट दिली.
- प्रदीप भाड, प्रभारी वनपरिक्षेत्राधिकारी, अंजनगाव