लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांतील २४६ उद्योग- व्यवसाय सुरू करण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आली आहे. या काळात जिल्ह्याच्या सीमा बंदच राहणार आहेत. यानुसार सुरू होत असलेल्या उद्योग व व्यवसायांतून कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचे पालन व्हावे, त्याचप्रमाणे, नागरिकांनीही गर्दी टाळून दक्षता पाळावी, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी केले आहे.कोरोना संकटामुळे अनेक उद्योग- व्यवसायांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, या काळात संबंधित उद्योग व व्यावसायिकांनी आपले अधिकारी व कर्मचाऱ्यांची पूर्णत: काळजी घ्यावी. त्यांना सर्व आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, शेतमाल, शेतीविषयक कामे हे यापूर्वीच सुरू ठेवण्यात आले होते. मात्र, अनेक उद्योग- व्यवसाय बंद असल्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रातील उद्योग व्यवसाय दक्षता पाळून सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. उद्योजक-कारखानदारांनी आपल्या कर्मचारी, कामगारांची काळजी घ्यावी. उद्योग व्यवसाय सरू करण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी योजनेत कक्षदेखील स्थापन करण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.कामगारांमध्ये सोशल डिस्टन्स महत्त्वाचेपाणीपुरवठ्यासह आवश्यक सेवा सुरू राहाव्यात व आवश्यक विकासकामांना गती मिळावी, यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. एमआरइजीएसअंतर्गत आवश्यक कामे, पांदण रस्ते आदी कामांची परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमआयडीसीमधील व औद्योगिक वसाहतीबाहेरील उद्योगही सुरू होतील. संबंधित उद्योजक, कंत्राटदार, व्यावसायिक यांनी आपले कामगार, कर्मचारी यांची सुरक्षितता राखावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील २४६ उद्योग, व्यवसाय आजपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 5:00 AM
कोरोना संकटामुळे अनेक उद्योग- व्यवसायांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, या काळात संबंधित उद्योग व व्यावसायिकांनी आपले अधिकारी व कर्मचाऱ्यांची पूर्णत: काळजी घ्यावी. त्यांना सर्व आवश्यक साधने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देपालकमंत्री : परवानगीसाठी कलेक्ट्रटमध्ये एक खिडकी कक्ष स्थापन