तालुक्यातील ४६ हजार ३९३ रेशन कार्डधारकांना व त्यामागील १ लाख ९२ हजार ६७८ लाभाथींना मे महिन्यात दोन वेळा मोफत धान्य स्वस्त धान्य दुकानातून मिळणार आहे. यासंबंधी अचलपूर तालुक्यातील पुरवठा विभागाने युद्धस्तरावर तयारी केली असून, धान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यभर लावलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व गोरगरिबांना धान्य मिळावे, याकरिता अंत्योदय व प्राधान्य गटतील रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वाटप करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने घोषित केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना भाग-३ अंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य गट लाभार्थींना मोफत धान्य मिळणार आहे.
अचलपूर तालुक्यात ६००३ अंत्योदय कार्डधारक असून, २२,३१९ लाभार्थी आहे. प्राधान्य गटाचे ४० हजार ३९० कार्डधारक असून, १ लाख ७० हजार ३५९ लाभार्थी आहे. या सगळ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, केशरी कार्डधारक या योजनेपासून वंचित राहतील तसेच अंत्योदय कार्डधारकांना साखरसुद्धा मोफत मिळणार नाही. मे महिन्यात दोन वेळा रेशन धारकांना मोफत धान्य मिळणार आहे.
कोट
अचलपूर तालुक्यातील १६६ स्वस्त धान्य दुकानातून मे महिन्याचे दोन वेळचे मोफत धान्य नियमित वाटप सुरू झाले आहे. ज्या दुकानात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे मागील धान्य शिल्लक होते, तिथे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील धान्यवाटप सुरू आहे. उर्वरित दुकानात १५ मेनंतर प्रधानमंत्री योजनेचे धान्य गोदामातून जाईल.
- शैलेश देशमुख, पुरवठा अधिकारी, अचलपूर