सात-बारा कोरा केव्हा ? : जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेचे १,२६७ कोटींचे कर्ज अमरावती : सतत दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती आदींमुळे जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. पुनर्गठनामुळे मध्यम मुदती कर्जात झालेले रूपांतर, नियमित हप्ते न भरल्यामुळे शेतकरी कर्जदार झाले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार २५९ शेतकऱ्यांकडे एक हजार २६७ कोटी २९ लाख रुपयांचे कर्ज थकीत आहेत. कर्जमुक्ती असो की कर्जमाफी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.सलग ४ वर्षांच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजला आहे. अशा परिस्थितीत यंदा खरीप व रबी हंगामात शेतकऱ्यांना उत्पन्नाची आशा दिसत असताना हमी पेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना जगावं कसं? ही समस्या नैराश्य आणत आहे. शासनाने जुन्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे निर्देश दिलेत. मात्र शेतकऱ्यांच्या म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेसह काही व्यावसायिक बँकांनी ठेंगा दाखविला. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज थकीत राहिले. त्यामुळे नव्याने कर्ज मिळविताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहेत.गतवर्षीच्या खरिपात जिल्हा बँकेला ५७१ कोटी ३३ लाख रुपयांच्या पीक कर्जवाटपाचे लक्षांक होते. त्या तुलनेत जिल्हा बँकेने ५७ हजार ३५७ शेतकऱ्यांना एक लाख सात हजार ९३३ हेक्टरसाठी ३९३ कोटी ३३ लाखांचे कर्जवाटप केले.३०९५ शेतकरी आत्महत्याअमरावती : व्यावसायिक बँकांनी ११७२ कोटी १३ लाख लक्षांकाच्या तुलनेत एक लाख दोन हजार १०१ शेतकऱ्यांना ८८८ कोटी ५० लाख रूपयांचे कर्जवाटप केले, तर ग्रामीण बँकांना १६ कोटींचे लक्षांक असताना एक हजार ८४२ शेतकऱ्यांना १३ कोटी ६० लाख रुपयांचे कर्जवाटप केले. कर्जवाटपाची ही टक्केवारी ७४ आहे. मात्र शेतमालास भाव नाही. त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही कठीण झाल्याने शेतकरी बँकाचे थकीत कर्जदार होत आहेत. जिल्ह्यात २००१ पासून आतापर्यंत तीन हजार ९५ कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत यापैकी एक हजार २३६ प्रकरणे पात्र, एक हजार ८३५ अपात्र २४ प्रकरणे चौकसीसाठी प्रलंबित आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी जिल्ह्यात ३४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या असणारा अमरावती जिल्हा ठरला आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख तीन हजार २५९ शेतकऱ्यांचे १२६७.२९ कोटीचे पीककर्ज थकीत आहे. याविषयीचा अहवाल शासनाला सादर केला आहे. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)रबी कर्ज वाटपाला जिल्हा बँकेचा ठेंगाजिल्ह्यात रबी कर्ज वाटपाचे ३८६ कोटी २२ लाख रुपयांचे लक्षांक आहे. यामध्ये जिल्हा सहकारी बँकेला १२५ कोटी ४२ लाख व ग्रामीण बँकांना २ कोटी १६ लाख रुपयाचे लक्षांक असताना या दोन्ही बँकांनी कर्जवाटपाला ठेंगा दाखविला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना २५८ कोटी ६४ लाख रुपयांचे लक्षांक असताना फेब्रुवारी २०१७ अखेरपर्यंत ११५ कोटी ८१ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. वाटपाची ही ४५ टक्केवारी आहे.जिल्हा बँकेचा एनपीए २३२ कोटी ६७ लाखजिल्हा सहकारी बँकेचे एकूण ७१० कोटी ५८ लाख ३८ हजार पीक कर्ज आहे. यापैकी ३५७ कोटी ५० लाख ५२ हजार शेती मुदती कर्ज आहे. असे एकूण १०६८ कोटी ८ लाख ९० हजार कर्ज येणे बाकी आहे.या येणे कर्जापैकी ३५ हजार ८३३ शेतकऱ्यांचे ३२१ कोटी ७३ लाख ६४ हजार पीक कर्ज येणे बाकी आहे, तर २२ हजार २७५ शेतकऱ्यांचे ११२ कोटी ४ लाख ३८ हजारांची थकबाकी आहे.१८ हजार ६५ शेतकऱ्यांचे १२२ कोटी १६ लाख २६ हजार एनपीए (अनुत्पादक मालमत्ता) कर्ज आहे. १४ हजार ५५४ शेतकऱ्यांकडे ११० कोटी ५१ लाख १४ हजार एनपीए शेतीमुदती कर्ज आहे. एकूण २३२ कोटी ६७ लाख ४० हजारांचा एनपीए आहे.
दोन लाख शेतकऱ्यांचे कर्ज थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2017 12:03 AM