आयुक्तांचे आदेश : नागपूर येथून मागविली क्रेनअमरावती : स्थानिक पॅराडाईज कॉलनी व राधानगरात अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले दोन मोबाईल टॉवर हटविण्याची कारवाई रविवारी महापालिका प्रशासनाने केली. रिलायन्स आणि इंडस कंपनीचे हे टॉवर असल्याची माहिती आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पॅराडाईज कॉलनी व राधानगरात अनधिकृत टॉवरसंदर्भात परिसरातील नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. दरम्यान, राधानगर येथे माणिकराव एडाखे यांच्या इमारतीवर रिलायन्स कंपनीचे अनधिकृत मोबाईल टॉवरचा विषय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ठ असल्याचे रिलायन्सच्या अभियंत्यांनी सांगितले. ही इमारत हल्ली दीपाबाई इंगळे यांच्या नावे असून त्यांनाच या टॉवरचे भाडे मिळते. मात्र, आयुक्त गुडेवार यांनी धोकादायक पध्दतीने उभारण्यात आलेले रिलायन्स कंपनीचे टॉवर हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी हे मोबाईल टॉवर हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच मौजे तारखेडा, प्लॉट क्र. ८७ पॅराडाईज कॉलनीतील अब्दुल मतीन अब्दुल लतिफ यांच्या मालकीच्या जागेवर हे मोबाईल टॉवर उभारण्यात आले होते. नागरिकांनी टॉवर उभारणीबाबत आयुक्तांकडे तक्रार दिली होती. आयुक्तांनी हे टॉवर काढण्याचे निर्देश दिले होते. रविवारी सकाळी ७ वाजतापासूनच महापालिका चमू दाखल झाली होती.तक्रारकर्त्यांचा नगरसेविकेसोबत वादअमरावती : नागपूर येथून मागविलेल्या क्रेनद्वारे हे टॉवर हटविण्याला प्रारंभ झाला आहे. सुमारे दोन तास हे टॉवर हटविण्याची कारवाई चालली आहे. दरम्यान, इंडस कंपनीने महापालिकेत हे टॉवर नियमित करण्याबाबतचा अर्ज सादर केला होता. मात्र सहायक संचालक नगररचना विभागाचे सुरेंद्र कांबळे यांनी मोबाईल टॉवर परवानगी नाकारली. परिणामी महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी हे टॉवर हटविण्यासाठी आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी मोबाईल टॉवर हटविण्याची कारवाई करण्यात आली. तसेच राधानगरातील रिलायन्स कंपनीचे मोबाईल टॉवर हटविण्याची कारवाई उशिरा सायंकाळपर्यंत सुरू होती. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या मार्गदर्शनात उपअभियंता दीपक खडेकार, घनशाम वाघाडे, अतिक्रमण विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे, पोलीस निरीक्षक रामभाऊ खराटे आदींनी मोबाईल टॉवर हटविण्याची कारवाई केली.पॅराडाईज कॉलनी येथे अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्याची कारवाई सुरू असताना काही तक्रारकर्त्यांची या परिसरातील नगरसेविका लुबना तनवीर मुन्ना नवाब यांच्याशी वाद झाला. त्यानंतर काही जण नगरसेविका लुबना तनवीर यांच्या अनधिकृतपणे घरात शिरले. घरातील साहित्य, खुर्च्यांची फेकफाक केली. त्यानंतर दोन्ही गटाचे भांडण गाडगेनगर ठाण्यात पोहोचल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
दोन मोबाईल टॉवर हटविले
By admin | Published: November 30, 2015 12:25 AM