लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शासकीय तुर चोरी प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून शुक्रवारी रात्री आणखी दोघांना अटक केली आहे. प्रभाकर मेश्राम व गणेश पावडे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ लाख ९२ हजारांची तुर व गुन्ह्यात वापरलेली चार वाहने असा एकुण ११ लाख २ हजार ३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कृषि उत्पन्न बाजार समितीमधून २२ लाखांची तुर चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर गुन्हे शाखेने तपासाची सुत्रे हलविली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम व पोलीस उपनिरीक्षक राम गिते यांच्या पथकाने शिताफीने तपास करून आतापर्यंत सात आरोपींना गजाआड केले. कामगारांनी दुचाकी व चारचाकी वाहनातून दररोज तुरीचे पोते चोरून नेल्याचे पोलीस चौकशीत निदर्शनास आले आहे. याप्रकरणात आतापर्यत रमेश सावळे, दिनेश सावळे संजय बढे, विनोद बावने आणि मनोज बावने या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तूर चोरीत आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 9:28 PM
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शासकीय तुर चोरी प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून शुक्रवारी रात्री आणखी दोघांना अटक केली आहे.
ठळक मुद्देचार वाहने जप्त : आरोपींच्या संख्येत वाढ