: प्रशासनाचे कानावर हात
परतवाडा : मध्यप्रदेशातील एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या परतवाड्यातील एकाने अवघ्या सहा तासात कोरोनावर मात केली आहे. यात कुठलेही औषध न घेता हा अभियंता कोरोनामुक्त झाला आहे.
शहरातील दोन खाजगी प्रयोग शाळेतील अहवालावरून हे सत्य पुढे आले आहे. सहा तासांच्या फरकाने केलेल्या तपासणीत तफावत आढळून आली. सहा तासापुवीर् केलेल्या तपासणीत पॉझिटिव्ह असलेल्या त्या तरूणाची सहा तासानंतर केलेली दुसरी ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आली. सबब, त्याने सहा तासात कोरोनावर मात केल्याची प्रतिक्रिया उमटली आहे.
या अभियंत्याला आपल्या कंपनीत नोकरीवर रुजू व्हायचे होते. मध्यप्रदेश मध्ये जायचे असल्याने त्याने १२ मे रोजी शहरातील खासगी प्रयोगशाळेत स्वतःची रॅपिड अँटीजेन टेस्ट करवून घेतली. यात सकाळी ९ वाजता पहिल्या प्रयोगशाळेत केलेली ही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह निघाली. यानंतर याच दिवशी त्याने शहरातील दुसऱ्या प्रयोगशाळेत दुपारी अडीच वाजता परत ही टेस्ट करवून घेतली. तेव्हा ते कोरोना निगेटिव्ह आले.
एकाच दिवशी एकदा पॉझिटिव आणि दुसऱ्यांदा निगेटिव्ह अहवाल प्राप्त या युवकाने तशी माहिती अचलपूर पालिकेच्या मुख्याधिकार्यांना दिली आहे. त्याने मध्यप्रदेशकडे जाण्यास अनुमति मागितली आहे. त्यामुळे ते भिन्न अहवाल चर्चेत आले आहेत.