धामणगाव रेल्वे : चना विक्री करून घरी असलेल्या दुकानासाठी किराणा माल खरेदी करण्याकरिता आलेल्या एका शेतकऱ्याच्या हातातून तब्बल ८२, ९०० रुपये घेऊन पळ काढणाऱ्या दोन्ही आरोपींना दत्तापूर पोलिसांनी सोमवारी चांदूर रेल्वे परिसरात सायंकाळी अटक केली.
आकाश माहुलकर (३०) व कपिल रहाटे (२८, दोन्ही रा.महमदपुरा धामणगाव) असे आरोपीचे नाव आहे. गव्हा फरकाडे येथील शेतकरी माजी सरपंच हेमराज महादेव हुडे यांनी रविवारी अमरावती येथे चना विक्री करून किराणा दुकानात माल खरेदीकरिता मित्र अनिल चकवेसोबत गावातीलच ऑटोने रविवारी दुपारी साडेपाच वाजता धामणगाव शहरात पोहोचले. कविता ऑप्टिकल बाजूने असलेल्या सद्गुरू किराणा जवळ आटो बसून आपल्या खिशातील पिशवीतील ८२ हजार ९०० रुपये काढत मोजत असताना दोन भामट्याने सर्व रक्कम घेऊन पळ काढला. लगेच आरडाओरड सुरू झाली. मात्र, आरोपी फरार झाले होते. हेमराज हुडे यांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. येथील ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन लगेच शहरात नाकाबंदी केली. दरम्यान सुधीर बावणे यांच्या नेतृत्वात दोन पोलीस पथक रवाना केले. एवढ्या शिताफीने पैसे हातातून स्कूल येणार आहे धामणगाव परिसरातील रहिवासी असल्याचा पोलिसांना संशय होता त्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान चांदूर रेल्वे येथील एका ढाब्यावर दारू पीत असल्याचे टिप्स दत्तापूर पोलिसांना मिळाली त्यामुळे ठाणेदार ब्रह्मानंद शेळके यांनी लगेच या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.