शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते; राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
2
न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार देशाचे ५१ वे सरन्यायाधीश; इलेक्टोरल बॉण्ड्सपासून VVPAT पर्यंत घेतलेत महत्त्वाचे निर्णय
3
माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची साडेतीन कोटींची फसवणूक, व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल
4
हाहाकार! आंध्र प्रदेशात पावसाचे थैमान; कंबरभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा
5
Baba Siddique : रेकी, यूट्यूबवरुन ट्रेनिंग, फिल्मी स्टाईलने पळण्याचं प्लॅनिंग; बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी नवा खुलासा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा थेट लॉरेन्स बिश्नोईला मेसेज, म्हणते- "मला तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचं आहे..."
7
तूळ संक्रांती: ७ राशींवर सूर्य कृपा, ५ राशींनी राहावे अखंड सावध; ‘हे’ उपाय उपयुक्त! पाहा
8
कोट्यवधींचं घबाड! ज्युनिअर ऑडिटर निघाला धनकुबेर; नोटा मोजण्यासाठी मागवल्या मशीन
9
हिटमॅन Rohit Sharma चा फ्लॉप शो; तो क्लीन बोल्ड झाल्यावर कोचची 'गंभीर' रिअ‍ॅक्शन व्हायरल
10
कोण आहे अब्जाधीशाची मुलगी वसुंधरा, जिला युगांडात झालीये अटक, काय प्रकरण, कुटुंबाची संपत्ती किती?
11
हॉटेलच्या बाल्कनीमधून कोसळून अवघ्या ३१ वर्षीय गायकाचा दुर्दैवी मृत्यू, संगीतप्रेमींवर शोककळा
12
IND vs NZ 1st Test : टीम इंडियाच्या Playing XI मध्ये एन्ट्री झाली, पण Sarfaraz Khan च्या पदरी पडला भोपळा
13
"आम्ही हे खपवून घेणार नाही!" सलमाननंतर गायिका नेहा कक्करला मिळाली धमकी! नेमकं काय घडलं?
14
"या देशात असा विचार..."; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीविषयी शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
पाकिस्तानच्या जमिनीवरूनच भारताने सुनावले खडेबोल; दहशतवाद, फुटीरतावाद ठरतोय अडथळा : जयशंकर
16
लोकहिताचा निर्णय रद्द कराल, तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम होईल; CM शिंदे यांचा विरोधकांना इशारा
17
गुडन्यूज! ३९व्या वर्षी गरोदर आहे राधिका आपटे, रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला बेबी बंप
18
३ दिवसांत १३ विमाने उडविण्याच्या धमक्या; केंद्र सरकारकडून उपययोजना सुरू
19
Reliance Bonus Shares : रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना दिवाळी गिफ्ट! 'या' दिवशी मिळणार बोनस शेअर्स; एक्सपर्ट बुलिश
20
संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम

दोन रूपयांची बैलजोडी, सहा रूपयांचा कर

By admin | Published: November 03, 2016 12:20 AM

गावाचा सर्वांगीण विकास व्हावा व गावात स्वच्छता राहावी, यासाठी नगराध्यक्षपदी विराजमान होताच पहिले ...

आठवण निवडणुकीची : प्रथम नगराध्यक्ष सुगनचंद लुणावत मोहन राऊत धामणागाव रेल्वेगावाचा सर्वांगीण विकास व्हावा व गावात स्वच्छता राहावी, यासाठी नगराध्यक्षपदी विराजमान होताच पहिले नगराध्यक्ष झालेले सुगनचंद चुन्नीलाल लुणावत यांनी दोन रूपयांची बैलजोडी घेऊन गावाच्या विकासासाठी कोणताही शासनाकडून निधी मिळत नसल्याने इतर गावातून येणाऱ्या बैलगाड्यांवर महिन्याकाठी सहा रूपयांचा कर लावण्याचा निर्णय घेतला होता़धामणगाव पालिकेची पहिली निवडणूक ३० नोव्हेंबर १९४६ रोजी झाली. यावेळी धामणगाव ही मध्यप्रदेशची राजधानी होती़ यावेळी झालेल्या निवडणुकीत सुगनचंदजी चुन्नीलाल लुणावत हे नगराध्यक्ष तर दोन उपाध्यक्ष म्हणून लक्ष्मीनारायण दुलिचंद व देवराव नारायण इंगळे हे होते़ धामणगावातील मैला बाहेर नेण्यासाठी बैलजोडी नसल्याने नगराध्यक्षपदी विराजमान होताच सर्व सदस्यांच्या सहमतीने दोन रूपयांची बैलजोडी विकत घेतली व गावाच्या स्वच्छता मोहिमेकडे लक्ष वेधले होते़ धामणगाव ही पूर्वीच्या काळापासून व्यापारी पेठ असल्याने इतर गावातील बैलबंड्या कापूस व धान्य विक्रीकरिता धामणगाव शहरात येत असत. या काळात शासनाकडून कोणताच निधी मिळत नसल्याने महिन्याकाठी सहा रूपये करवसुली करण्यात येत होती. रीतसर पावती देऊन दरवेळी येणाऱ्या शेतकऱ्यांना एकदा फाडलेली पावती महिन्याच्या शेवटपर्यंत शहरात येताना दाखवावी लागत असे़ करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी चौदा रूपये वेतन व अकरा रूपये महागाईभत्ता दिला जात होता़ महात्मा गांधींच्या हत्येची बातमी धामणगावात येताच संपूर्ण गावात स्मशानशांतता पसरली होती़ तर तिसऱ्या दिवशी पालिकेच्या परिसरात संपूर्ण गावाने एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली होती़ १ डिसेंबर १९४८ रोजी महाविदर्भ निर्मितीचा ठराव घेण्यात आला होता़ मध्यप्रदेश व वऱ्हाडचे कायदेमंत्री अण्णासाहेब देशमुख तसेच शिक्षणमंत्री गोखले यांना सन्मानपत्र देण्याकरिता ५० रूपयांचा खर्च सर्वानुमते ठरावात मंजूर करण्यात आला होता़ १९ एप्रिल १९४७ मध्ये मुन्सिपल कमिटीच्या ताब्यात असणाऱ्या शाळेतील शिक्षकांना महिन्याकाठी अकरा रूपये वेतन दिले जायचे़ सुगनचंद लुणावत यांनी ३० नोंव्हेबर १९४६ ते २५ मार्च १९५० पर्यंत यशस्वीपणे कार्यभार सांभाळला होता़ यावेळी सदस्य म्हणून मारोती किसनसा खंडेतोड, लक्ष्मण गोंविद झामरे, पदमसीभाई बेरसीभाई, शिवाजी मोतीराम, रणछोडदास खिमजी, सूरजमल मोतीलाल सोनी, जगदत्त महेश चौबे, रामहक्क जगदेव, रामणराव जानबाजी, नारायणराव किसनराव, लाभचंद गुलाबचंद राठी, तुळसीदास पंत जनार्धन देशपांडे, अबदुल शकरू उमर, कौशल्याबाई केणे हे प्रामुख्याने सदस्य म्हणून कार्यरत होते़